वर्धा/प्रमोद पाणबुडे:
मोरांगणा येथील आर्मीतील जवानाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असलायची घटना घडली आहे. ३० वर्षीय भूषण दांडेकर असे त्याचे नाव असून तो बेळगाव येथे कर्तव्यावर होता. अचानक हृद्य विकाराचा झटका आला आणि त्याला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातच त्याचा मृत्यू झाला आहे.
वर्धा जिल्ह्यातील मोरांगणा ता, आर्वी येथील राहिवासी सुनील दांडेकर वय 54 धंदा शेती यांचा सैन्य दलात असलेला मोठा मुलगा भूषण सुनील दांडेकर वय 30 हा भारतीय सेने मध्ये मराठा इन्फेन्ट्री बटालियन बेळगाव कर्नाटक येथे शिपाई पदावर कर्तव्यात होता. त्याला 20 फेब्रुवारी रोजी हृदय विकाराचा झटका आल्याने बेळगाव येथून कमांडर हॉस्पिटल पुणे येथे उपचाराकरिता आणले होते. 22 फेब्रुवारी शनिवार रोजी पहाटे २.३० च्या दरम्यानहृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
पार्थिव रुग्ण वाहिके द्वारे पुणे येथून दुपारी ३ वाजता दरम्यान निघाले. रविवारी २३ ला सकाळी मोरांगणा येथे पोहचणार आहे. तसेच सोबत आई आणि वडील आहेत. तर घरी मोरांगणा येथे लहान भाऊ व नातेवाईक आहेत. पार्थिवावर अंत्यसंस्कार रविवारी शासकीय इंतमामात करण्यात येणार आहे. मोरांगणा येथे शहीद स्मारक समोर किंवा शेता मध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
भूषण सुनील दांडेकर हा बेळगाव येथील मराठा बटालीयनला होता. १३ फेब्रुवारी रोजी त्याला पहिला झटका आला होता. जवान भूषण याचा विवाह 4 वर्षा अगोदर झाला होता. विवाह,आई-वडील,पत्नी,आणि बहीण असा त्याचा परिवार आहे. मोरांगणा येथे होणाऱ्या अंत्य संस्कारासाठी प्रशासनाची तयारी सुरु असून पोलीस बंदोबस्त राहणार आहे.