चंद्रपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाकडून लघु उद्योगांना सबसिडीवर दिला जाणारा कोळसा खुल्या बाजारात अवैधरीत्या विकल्या जात असल्याचे समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचेकडे या प्रकरणाची तक्रार केली आहे.
पोलिस देखील या प्रकरणाच्या तपासामागे लागली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळालेल्या माहितीवरून सोमवारी रात्री चंद्रपूर घुग्गुस मार्गावरील नागाळा येथील 'वे-ब्रीज च्या परिसरात कोळसा भरलेले २४ ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी एलसीबीच्या पथकाने कसुन चौकशी सुरु केली.
बहुतांश उद्योग बंद असतानाही सबसिडीच्या कोळशाची उचल करून तो चोर बाजारात विकला जात होता, असा संशय पोलिसांना आहे.म्हणून या संपुर्ण प्रकरणार्थ तातडीने चौकशी लावण्याची गरज आहे कारण या संपुर्ण कार्यवाही टाळण्यासाठी पोलीसांवर राजकीय दबाव आणली जात आहे.नियमानुसार संबंधित उद्योगाचा कोळसा खानीतुन निघाल्यानंतर तो सरळ त्या उदयोगात गेला पाहिजे परंतु त्या लघुउद्योगाला न जाता तो सरसकट बाजारात विकला जातो हे गंभीर विषय आहे.
म्हणून या सर्वप्रकरणात तातळीने उच्चस्तरीय चौकशी करावी अश्या आशयाची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचेकडे केली आहे. त्या उद्योगांच्या व्यवस्थापनाची चौकशी करण्यासाठी पोलिसांची चार पथक रवाना झाली आहे. या संदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्काळ चौकशी करून अहवाल सादर करा अशे आदेशही दिले आहेत.