पारेगावच्या यात्रेकरुंचे गावकऱ्यांनी केले भजन कीर्तनाने स्वागत
येवला प्रतिनिधि/ विजय खैरनार
येवला: तालुक्यातील पारेगाव दिवसा डोक्यावर रगरगते उन्ह रात्री कडाक्याची थंडी सोबत फक्त कपड्यांचे गाठोडे सोबत घेत पारेगाव ता येवला येथील चौघा भाविकांनी ३५०० किलोमीटर पायी चालत खडतर प्रवास अवघ्या साडेतीन महिन्यात पार करत नर्मदा परिक्रमा यशस्वी पूर्ण केली
दि १ नोव्हेंबर २०१९ रोजी ओंकारेश्वर ( मध्यप्रदेश ) येथून भगवान शिवशंकराचे पूजन करून पारेगाव येथील श्री बाबुलाल गुजर वय ६०,दामू माळी वय ६१ ,रावसाहेब काळे वय ६० ताराबाई काळे वय ५८ या भाविकांनी पायी यात्रा सुरु केली होती. मुख्य प्रवास दोन नोव्हेंबर रोजी सुरु करत सुमारे चार राज्यातील १०० पेक्षा जास्त शहरातून तसेच काही ठिकाणी रस्ता देखील नसलेल्या ठिकाणी घनदाट जंगलातून हि अतिशय खडतर यात्रा पूर्ण केली आपल्या मूळगावी परत आल्यावर या भाविकांनी यात्रेदरम्यान आलेले अनुभव सत्कार समारंभ वेळ कथन केले यात बाबुलाल गुजर यांची प्रकृती देखील खालावली होती त्यांना सहकार्यांनी स्थानिक डॉक्टर कडे उपचारासाठी दाखल देखील केले होते डॉक्टरांनी यात्रा न करण्याचा सल्ला गुजर यांना दिला मात्र काही झालं तरी यात्रा पूर्ण करण्याची जिद्द उराशी बाळगत पायाला फोड येऊन सुद्धा बाबुलाल गुजर व त्यांच्या सहकार्यांनी यात्रा संपूर्ण नर्मदा नदीला प्रदक्षिणा करत सुमारे ३५०० किलोमीटर अंतर पूर्ण केले. नर्मदा परिक्रमा पूर्ण करून गावी परत आल्यानंतर पारेगाव येथील भजनी मंडळांने व गावकऱ्यांनी यात्रेकरूंचे भजन पूजन करत स्वागत केले या वेळी पारेगाव येथील जेष्ठ नेते जनार्धन खिल्लारे ,दौलत सुरासे गोटीराम पाठे ,रावसाहेब वाळके ,बाळासाहेब खिल्लारे ,शिवाजी भोसले,माधव गुजर,सचिन सोनवणे ,घनशाम बंड आदींनी त्यांचे स्वागत केले