कारंजा (घा):
कारंजा (घा) येथील' कारंजा नागरी समस्या संघर्ष समिती'च्या वतीने विविध मंडळ, मंच ,संस्था, संघटना, शिक्षक ,शिक्षिका विद्यार्थी-विद्यार्थिनी,सामाजिक कार्यकर्ते ,पत्रकार प्रतिनिधी व नागरिक यांनी तहसीलदार यांच्यामार्फत शासनाला निवेदन देऊन हिंगणघाट येथील प्राध्यापिका तरुणीवर पेट्रोल टाकून जाळणाऱ्या माथेफिरु तरुणाला व त्याच्या साथीदाराला जलदगती न्यायालयात द्वारे ताबडतोब कठोर शिक्षा व्हावी व महिलांना सुरक्षा मिळावी .याबाबत घटनेचा निषेध करून मागणीचे निवेदन सादर केले .
3 फेब्रुवारी रोजी हिंगणघाट येथे समस्त मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेल्या शांतिप्रिय वर्धा जिल्ह्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील प्राध्यापिका तरुणीवर कॉलेजमध्ये अध्यापनाचे कार्य करण्याकरता जात असताना भर रस्त्यावर एका माथेफिरु आधमाने तिच्यावर पेट्रोल टाकून जाळले हे कृत्य अतिशय निंदनीय व निषेधार्ह आहे.
या घटनेने हिंगणघाट आणि वर्धा च नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला आहे या घटनेमुळे सर्वत्र शिकणाऱ्या महाविद्यालयीन तरुणी, स्त्रिया व मुलींचे पालक यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या घटनेची यंत्रणेमार्फत ताबडतोब चौकशी होऊन जलदगती न्यायालया द्वारे कठोरातील कठोर शिक्षा या आधम तरुणाला व्हावी व पीडित तरुणीला व तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा व यापुढे अशा अधम प्रवृत्तीवर वचक बसावा ही मागणी "कारंजा नागरी समस्या संघर्ष समिती" चे वतीने शाळा ,महाविद्यालयातील,आय टी आय मधील शिक्षक, महिला शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी,गुरुदेव सेवा मंडळ ,संत गजानन महाराज संस्थान मंडळ, अवतार मेहेरबाबा अध्यात्मिक केंद्र , संवेदना युवा मंच, मराठा सेवा संघ, बुद्धिष्ट एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशन,संभाजी ब्रिगेड शाखा ,भ्रष्टाचार निर्मूलन समिती ,राष्ट्रीय मुस्लीम सेवा संघ , अखिल भारतीय परिवार,विठ्ठल टेकडी स्पोर्टिंग क्लब, मोडेल स्पोर्टिंग क्लब,प्रहार दिव्यांग संघटना , पत्रकार प्रतिनिधी ,इतर वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था ,संघटना, मंडळ, मंच व वेगवेगळ्या क्षेत्रातील समाजसेवी नागरिकांनी केलेली आहे.