Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, फेब्रुवारी २६, २०२०

सावली येथे राज्यव्यापी धरना आंदोलन



सावली : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी, महिलांवरती वाढते अत्याचार,बेरोजगारी, कर्जमाफी, भाजपा सरकारच्या काळातील विकासकामांना स्थगिती अशा विविध मागण्या घेऊन आज सावली तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसील कार्यालय सावली समोर राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले.
महाआघाडी सरकार हे फसवे सरकार असून त्यांनी जनतेच्या जनाधाराचा अपमान केलेला आहे.या सरकारच्या काळात दिवसेंदिवस महिलांवरती अत्याचार वाढत आहेत, शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचे खोटे आश्वासन दिले गेले असून अतिवृष्टी,दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५००० हजार देण्याची भूलथापना देण्यात आली आहे याचा निषेध म्हणून आज २५ फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यभरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यव्यापी धरणे आंदोलन सुरू केले आहे.याच पार्श्वभूमीवर सावली तालुका भाजपच्या वतीने सुद्धा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलेले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष अविनाश पाल , सतीश बोम्मावार (महामंत्री),संजय गजपुरे जिल्हा महामंत्री तथा जि प सदस्य,संतोष तंगडपल्लीवार(माजी बांधकाम सभापती),रवी बोलीवर, प स उपसभापती, योगिता डबले,मनीषा चिमूरकर जि प सदस्य,छाया शेंडे माजी प स सभापती,गणपत कोठारे प स सदस्य, विनोद धोटे युवा अध्यक्ष, अशोक आक्कूलवार, प्रकाश खजांजी,अर्जुन भोयर,अरुण पाल,सुदर्शन चामलवार,राकेश कोंडबंतूनवार,प्रसाद जक्कुलवार,देवानंद पाल,प्रवीण देशमुख, शरद सोनवणे, गोटू गुरनुले,व इतर मान्यवर भाजपा पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन महामंत्री दिलीप ठिकरे व आभार प्रदर्शन दीपक शेंडे यांनी केले.व तहसीलदार कुमरे मॅडम यांना निवेदन देण्यात आले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.