चंद्रपूर:
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र चंद्रपूर द्वारे 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक-युवतींकरिता 13 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी 2020 या 2 आठवडे कालावधीचे शेळीपालन, दुग्धव्यवसाय व कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रम भद्रावती येथे आयोजित करण्यात येत आहे.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ही उद्योग संचालनालय अंतर्गत कार्यरत महाराष्ट्र शासन पुरस्कृत स्वायत प्रशिक्षण संस्था असून या संस्थेचा मुख्य उद्देश विविध प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करून जास्तीत जास्त लोकांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्याकरिता प्रेरित करणे व उद्योजकतेला पूरक असे वातावरण निर्माण करणे हा आहे.
सदर प्रशिक्षणामध्ये शेडची रचना, व्यवसायाचे फायदे, शेळी,गाय व कोबडयांची विविध जाती, पैदास, निवड, प्रजनन, औषधोपचार, लसीकरण, निगा व संरक्षण प्रतीबंधक उपाय त्यांचे संगोपन व व्यवस्थापन, संतुलीत आहार, जिवनसत्वाचे महत्व, संसर्गजन्य रोग व त्यावर उपचार तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजना, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास, यशस्वी उद्योजक यांचे मार्गदर्शन, कर्ज प्रकरण तयार करण्याचे मार्गदर्शन, पशुधन विकास कार्यालयाच्या योजना व व्यवसाय संधी इत्यादी विषयांवर विशेष तज्ञ व शासकिय अधिकारी वर्गाद्ववारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणात प्रवेश घेण्याकरिता इच्छुक युवक-युवतींनी त्वरित दिनांक 12 फेब्रुवारी 2020 पर्यंत बिसेन कम्प्युटर एज्युकेशन, शिंदे पेट्रोल पंपजवळ,भद्रावती,जि. चंद्रपूर व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, उद्योग भवन, दुसरा माळा, गाळा क्रमांक 208, बस स्टॉप समोर,रेल्वे स्टेशन रोड, चंद्रपूर येथे स्वतःचा बायोडाटा, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, आधार कार्ड व दोन पासपोर्ट साईज फोटो घेऊन हजर राहावे. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के.व्ही.राठोड (मो.9403078773) ,07172-274416 व कार्यक्रम आयोजक मिलिंद कुंभारे ( मो. 9011667717), मनोज पेटकर (8956570550) यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.