Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी ०२, २०२०

शिवजयंती व महाशिवरात्री निमित्त जिल्ह्यात कलम 36 लागू

Image result for सार्वजनिक शांततेला व सुव्यवस्थेला
18 ते 23 फेब्रुवारी दरम्यान योग्य निर्बंध व निर्देश
देण्याचे अधिकार पोलीस ठाण्यांना प्रदान
चंद्रपूर:
 जिल्ह्यात शिवजयंती (शासकीय) दिनांक 19 फेब्रवारी व महाशिवरात्री 21 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येते. यादरम्यान सार्वजनिक शांततेला व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये यासाठी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी 18 ते 23 फेब्रवारी 2020 दरम्यान जिल्ह्यात कलम 36 लागू केले असून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना विशेष अधिकार प्रदान करण्यात आले. त्यासंबंधीचे निर्देश जारी करण्यात आले आहे.

या कालावधीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस अधीक्षकांनी कलम 36 जिल्ह्यात लागू केले आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबत, वाद्य वाजवणे, सभेचे आयोजन मिरवणूक काढणे, त्याठिकाणी रस्ते निश्चित करणे, लाऊड स्पीकर वापरणे, योग्य निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे. तसेच सदर आदेश लागू असताना सभा मिरवणुकीत वाद्य वाजवणे, लाऊडस्पीकर वाजवणे, मिरवणुकीत नारे लावणे,मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करण्यासाठी संबंधित ठाणे अंमलदार यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. 

कलम 33, 35 ते 40 व 45 या कलमान्वये काढण्यात आलेल्या आदेशांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना तसेच पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलिस अधिकारी यांनी या सर्व निर्देशाचे पालन करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पोलीस यंत्रणेला दिलेले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.