महिषासुराचा वधाचा सजीव देखावा सादर
येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार
येवला: तालुक्यामधील देवांग कोष्टी समाज वर्षभर विविध धार्मिक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम उत्साहात संपन्न करीत असतो या वर्षेही समाजातर्फे गुरुवार दिनांक 30 जानेवारी रोजी समाजाची कुलदेवता श्री चौंडेश्वरी मातेचा बसंत पंचमी महोत्सव उत्साहात व धार्मिक वातावरणामध्ये संपन्न करण्यात आला या प्रसंगी सकाळी साडेसात वाजता श्री चौडेश्वरी मातेचा दुग्धाभिषेक सोहळा संगमनेर येथील सौ .व श्री. प्रमोद खोजे ,सांगोला येथील सौ. व श्री .राहुल कांबळे, मार्गदर्शक सौ .व श्री. राधाकिसन बाबर आणि सौ .व श्री. रवींद्र वरोडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यानंतर श्री चौंडेश्वरी मातेच्या पालखीची मिरवणूक मंदिरापासून शहरातील मुख्य मार्गावरून ढोल-ताशांच्या व डीजे च्या गजरात मार्गस्थ झाली या प्रसंगी समाजातील भगिनींनी फेटे परिधान करून उत्कृष्ट असे झांज नृत्य आकर्षक प्रकार प्रकारे सादर केलेत तर वरोडे बंधू यांनी महिषासुरमर्दिनीच्या वधचा देखावा सादर केला .यामध्ये कुमारी भूमिका घटे हिने देवीचे तर वृषाल खोजे यांनी महिषासुराची भूमिका सादर केली तर सचिन ढोपरे व प्रज्वल भागवत यांनी सिंहाची यांची वेशभूषा सादर करून सर्वांची मने जिंकली .याप्रसंगी सचिन करंजकर यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री चौंडेश्वरी मातेस पैठणी साडी अर्पण केली तर संगमनेर येथील प्रमोद खोजे यांनी मंदिरात निशुल्क लायटिंग सजावट केली .यावेळी मातेची वंशपरंपरागत असलेली पुरोहित जोशी परिवाराचे सन्माननीय जयंत शास्त्री उर्फ बंडू शास्त्री लक्ष्मण जोशी पुरोहित यांना समाजातर्फे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .या सोहळ्यास हैदराबाद येथील रामेश्वरजी चोला ,भूम येथील उमेश ढगे, पुणे येथील अरुण वरोडे, अकलूज येथील हेमंत टेके ,बेळगाव येथील कृष्णा राजेंद्र तालुकर यांच्यासह नाशिक, नगर ,औरंगाबाद ,पुणे जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी पहाड गल्लीतील टक्कर गणेश मंडळाने नाष्ट्याची व्यवस्था केली तर श्रीकांत खंदारे यांनी उत्कृष्ट फेटा बांधून सेवा उपलब्ध करून दिली तसेच विद्याताई टेके (वरोडे) यांनी उत्कृष्ट भक्ती गीत सादर केले .सदर सोहळा यशस्वी करण्यासाठी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मनोज भागवत, उपाध्यक्ष अमोल असलकर ,कार्यकारणी मंडळ प्रमोद आवणकर, कैलास घटे,मनोज सगम ,संजय करंजकर ,विष्णू विधाते ,गणेश भंडारी ,गणेश खळेकर, मनोज काळंगे ,रोशन आदमने ,सागर टकले ,स्वप्निल करंजकर, गणेश फासे, शंकर विधाते आदींनी विशेष परिश्रम घेतले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज भागवत यांनी तर सूत्रसंचालन गणेश खळेकर , योगेश ढूमणे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रमोद आवणकर यांनी केले .