चंद्रपूर/ललित लांजेवार:
चंद्रपुरातील प्रसिद्ध महाकाली मंदिरातून ११ वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने चांगलीच खळबळ उडाली. मुळचे नागपूरचे असलेले बळवंत मडावी कुटुंबासह महाकाली मंदिर परिसरात वास्तव्यास आहे.मोल मजुरीसाठी ते भटकत चंद्रपूर येथे आले.व महाकाली मंदिर परिसरात राहू लागले, प्रसाद खाण्यासाठी जाते म्हणून गेलेली मुलगी बळवंत मडावी यांची मुलगी खुशबू मडावी बराच वेळ झाला मात्र परतली नसल्याचे समजताच प्रकाराला मोठे वळण मिळाले.
या घटनेची माहिती बळवंत मडावी यांनी शहर पोलिसांना दिली.शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे.व पोलिसांकडून मुलीचा शोध सुरु केला आहे.
लहान मुलींना पळवून नेण्याऱ्या रॅकेटचा नुकताच पोलिसांनी पर्दाफाश केला होता. त्यातच आता ही घटना समोर आल्याने शहरातील पालकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
घडलेल्या घटनेनंतर शहरात मुल पळविण्याची टोळी सक्रीय आहे हे नाकारू शकत नाही.पोलिसांनी या घटनेत कलम ३६३ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या मुलीचा तपास विशेष पथकाद्वारे शोध सुरू करण्यात आला आहे.