Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जानेवारी २९, २०२०

डॉक्टर मोरे यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी chdnews


वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे आश्वासन
थकीत पगाराबाबत सुद्धा तातडीने कार्यवाही करणार


चंद्रपूर  - चार महिन्यांचे थकीत पगार, किमान वेतन तसेच निविदा प्रक्रियेत अधिष्ठाता डॉक्टर मोरे यांनी केलेल्या भ्रष्टाचार विरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मधिल कंत्राटी कामगारांनी दि. 24 जानेवारी 2020 पासून साखळी उपोषण सुरू केले आहे. जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे.मार्च 2020 मध्ये बेमुदत उपोषण केल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांना किमान वेतन मंजूर झाले होते.परंतु अधिष्ठाता डॉ. मोरे यांनी किमान वेतनाच्या दरापेक्षा कमी दराच्या निविदेला नियमबाह्य मंजुरी दिल्यामुळे साडेचारशे च्या व कामगार किमान वेतनापासून वंचित आहेत. तसेच मागील चार महिन्यांपासून या सर्व कामगारांना पगार सुद्धा देण्यात आलेला नाही. यामुळे कंत्राटी कामगारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ झालेली आहे. चार महिन्याचा थकीत पगार तातडीने देण्यात यावा,किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यात यावी तसेच दोषी कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे व अधिष्ठाता डॉ. मोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे या मागण्यांचे निवेदन आज दिनांक 29 जानेवारी रोजी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना देण्यात आले. यावेळी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार सुद्धा होते. आमदार जोरगेवार यांनी यावेळी कंत्राटी कामगारांच्या समस्या मांडून अधिष्ठाता व दोषी अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांच्याकडे केली.यावर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन अमित देशमुख यांनी दिले.शिष्टमंडळात
जन विकास कामगार संघाचे सतीश येसांबरे ,अमोल घोडमारे, जन विकास सेनेचे आकाश लोडे, चंदू झाडे व प्रवीण मटाले उपस्थित होते. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणामध्ये आज राकेश मस्कावार, कांचन चिंचेकर, रिता रोहणकर,कल्पना बंडिवार व विश्रांती मेश्राम यांनी सहभाग घेतला

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.