Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जानेवारी १९, २०२०

जुन्नर नगर पालिका विषय समिती निवडणुकीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा बहिष्कार



जुन्नर ( आनंद कांबळे )
जुन्नर नगरपालिकेचे नगराध्यक्ष शाम पांडे नगर पालिकेचे कामकाज चुकीच्या पद्धतीने व बेकायदेशीरपणे करत असल्याचा आरोप करत त्यांच्या कामात कोणताही प्रकारचा व्यत्यय येऊ नये अशी उपरोधिक टीका करत नगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिनेश दुबे यांच्या नेततृत्वखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी विविध विषय समिती निवडणुकांवर बहिष्कार टाकला .दिनांक 18 रोजी नगरपालिकेची विविध विषय समितीचे निवडणुकीचा कार्यक्रम होणार होता. विविध विषय समित्यांचे सभापती निवड,सदस्य निवड यासाठी अर्ज दाखल करणे आदी निवडणूक प्रक्रिया संपन्न होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या व आघाडीच्या नगरसेवकांनी सभागृहातून बाहेर जाणे पसंत केले. गटनेते दिनेश दुबे नगरसेविका अलकाताई फुलपगार ,अश्विनी गवळी ,   मोनाली मस्के, हाजरा  इनामदार ,फिरोज पठाण ,अक्षय मांडवे, सुनील ढोबळे ,जमीर कागदी , आदींचा यात समावेश होता. नगराध्यक्ष शाम पांडे चुकीच्या  कार्यपद्धतीने नगरपालिकेचे कामकाज चालवीत आहेत. चुकीच्या पद्धतीने आहे. मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांचे   संगनमत असल्याने बेकायदेशीर पद्धतीने राजरोसपणे  हा प्रकार सुरू आहे .बोगस निविदा करणे ,अंदाजपत्रक फुगवून ठराविक लोकांना ती कामे   देऊन त्याचा  मलिदा  खाण्याचा शंकास्पद कारभार सुरू असल्याचा आरोप  दुबे यांनी  पत्रकाद्वारे केला . जुन्नर शहरासाठी विकासासाठी आमदार अतुल शेठ बेनके यांच्या माध्यमातून शासनाकडून मोठया प्रमानात  निधी आणून विकास कामे  करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्हाला कुठल्याही कमिटी ची गरज नाही, यासाठी आम्ही नगरसेवकांनी कुठल्याही कमिटी करता अर्ज दाखल केले नाही. नगराध्यक्ष व त्यांच्या कामकाजामध्ये  आम्हा  नगरसेवकांचा  कोणताही व्यत्यय येऊ नये अशी उपरोधिक टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभागृहाबाहेर जाणे पसंत केले असे  दुबे यांनी म्हटले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.