चांपा येथे"भूजल संबंधित सार्वजनिक विचार विमर्श कार्यक्रम
चांपा/प्रतिनिधी:
जलशक्ती मंत्रालय , भारत सरकारच्या जल संसाधन नदी विकास आणि गंगा संरक्षण विभागाचे केंद्रीय भूमीजल बोर्ड , मध्यक्षेत्र नागपुर द्वारा आयोजित उमरेड तालुक्यातील चांपा ग्रामपंचायत कार्यालयात आज दि.२३ रोजी "भूजल संबंधित सार्वजनिक विचार विमर्श कार्यक्रमात गावांतील नागरीक , महिला व शेतकऱ्यांसाठी , एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूमीजल बोर्ड , नागपुरचे क्षेत्रीय निदेशक डॉ .पी .के जैन यांनी पाण्याचे दुर्भीक्ष भासणार नाही असे प्रतिपादन केले . डॉ .जैन पूढे म्हणाले ,जगात तिसरे महायुद्ध फक्त पाण्यासाठी होणार ; पाण्याचे नियोजन जे महिलांकडुन शिकण्यासारखे आहे .तसेच दैनंदिन जिवनात किती व कसा पाण्याचा वापर करावा , कोणत्या पिकाला किती पाणी लागते , असे विविध उदाहरणासह पटवून दिले .मार्गदर्शन करतेवेळी स्लाइड शो च्या माध्यमातून आदर्श गावाचे उदाहरण देतेवेळी नगर जिल्ह्यातील आदर्श गाव हिवरे बाजार , व वर्धा जिल्ह्यातील तामसवाडा या गावांचे उदाहरण देत ग्रामसभेचे महत्व पटवून दिले .
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उमरेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश कोल्हे व ग्रामपंचायत चांप्याचे सरपंच अतिश पवार होते . उमरेडचे गटविकास अधिकारी सुरेश कोल्हे यांनी पाणी आडवा , पाणी जिरवा , यावर आपले मार्गदर्शन सादर करतांना उदयाचे भविष्य वाचवायचे असेल तर आज पाणी वाचवणे व त्यांचे प्रबंधन करून आराखडा तयार करणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन करतेवेळी सांगितले .
कार्यक्रमात केंद्रीय भूमीजल बोर्ड , नागपुरचे क्षेत्रीय निदेशक डॉ .पी .के जैन यांनी गटविकास अधिकारी सुरेश कोल्हे सोबतच गावात पाण्याचे नियोजनबद्ध उत्तम कामगीरीबद्दल सरपंच अतिश पवार यांचा सत्कार करण्यात आला .
या एकदिवसीय प्रशिक्षणामध्ये प्रामुख्याने पाण्याचे पुनभरण आणि गावाच्या पाण्याचे तारेबंध या विषयांवर व्याख्याने देण्यात आली .कार्यक्रमाचे संचालन केंद्रीय भूजल वैज्ञानिक अश्विन आटे यांनी केले.कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मोठया संख्येत आपली उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूरचंद यांनी केले तर आभार प्रदर्शन भूजल वैज्ञानिक संदीप भोवल यांनी केले .कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी किशोर कोहरे , व तसेच ग्रामपंचायतचे कर्मचाऱ्यांचे योगदान होते .