Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जानेवारी २१, २०२०

अजब-गजब:संक्रांतीच्या वाणामध्ये दिल्या ओबीसी जनगणनेच्या पाट्या


संक्रांतीच्या वाणामध्ये दिल्या 
ओबीसी जनगणनेच्या पाट्या
चंद्रपूर/प्रतिनिधी:

              देशात २०२१ मध्ये जनगणना होणार आहे. मात्र त्यामध्ये ओबीसींसाठी नमुद करायला काॅलम नाही. त्यामुळे संभाजी ब्रिगेड, नॅशनल ओबीसी फेडरेशन, जिजाऊ ब्रिगेड, ओबीसी महासंघ सारख्या अनेक संघटना ओबीसी जनगणनेबाबत आग्रही आहेत. अंजलीताई साळवे ह्याच्या न्यायालयीन लढा, मिशन संसद, मिशन विधिमंडळ ठराव तसेच त्यांच्या "लढा ओबीसी जनगणना 2021 "पाटी लावा" मोहीमेतील पाट्या लावा मोहीम महाराष्ट्रातील विदर्भा सह इतरही भागात  जोरात सुरू आहे.

             अशातच सध्या संक्रांतीसाठी सर्वत्र महिला विविध प्रकारचे वाण देण्याची प्रथा असतांना बल्लारपुरात वाणामध्ये "जनगणना 2021 मध्ये ओ बी सी (व्हीजे ,एनटी,डीएनटी,एस बी सी)चा कॉलम नाही म्हणून आमचा जणगणनेत सहभाग नाही " अश्या आशयाच्या पाट्या वाण म्हणून देऊन सरकार ने ओबोसी ची जनगणना करावी असा संदेश सरकार ला पोहचवून  डॉ ऍड अंजली साळवे ह्यांच्या लढ्यात सहभाग दर्शविला व सदर महिलांनी सामाजिक कर्तव्य पार पाडले. सौ माधुरीताई खुटेमाटे यांच्याय पुढाकारातुन जिजाऊ ब्रिगेडच्या अॅड. प्रिती पावडे, अर्चनाताई फरकाडे, लताताई भेंडारकर, मंजुषाताई सरोदे, सारिका पायताडे, निकीता खाडे, पौर्णिमा वैद्य या महिलांनी वाणामध्ये या ओबीसी जनगणनेच्या पाट्या वाणामध्ये दिल्या. 

          जिल्ह्यात मराठा सेवा संघाचे दिनेश पारखी यांची जनजागृती जोरात सुरू असतांना अंजलीताई साळवे यांच्या पाट्या मोठ्या प्रमाणात घरांवर लाऊन दिसत आहे. बल्लारपुरात विवेकभाऊ खुटेमाटे, चंद्रशेखर भेंडारकर यांच्यासारखे अनेक व्यक्ती या कार्यात लागुन आहे. महिलांनी आता वाणामध्ये ओबीसी जनगणनेच्या पाट्या द्यायला सुरूवात केल्यामुळे येत्या काळात ओबीसी जनगणनेचा मुद्दा महत्वाचा ठरणार हे मात्र नक्की.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.