Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, डिसेंबर ०१, २०१९

वाळू तस्करीच्या वादातून गोळी झाडून हत्या

खापरखेडा जवळील वारेगाव शिवारातील घटना; आरोपी पसार 
खापरखेडा :
रेती तस्करीच्या जुन्या वादात माउझरने गोळी झाडून जख्मी केल्या प्रकरणी मध्यवर्ती कारागृहातून शिक्षा भोगून आलेल्या मृतकास दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ही घटना खापरखेडा येथून जवळ असणा-या वारेगाव सुरदेवी टी पॉइंटवर आज सकाळी 9ः30 च्या  सुमारास घडली. मंगेश बागडे वय (25) रा. साहोली असे मृतकाचे नाव तर राजेश पेंदाने (33)   सचिन चव्हाण (32) दोन्ही रा. भानेगाव असे फरार झालेल्या दोन आरोपीचे नांव आहेत.


मिळालेल्या माहिती नुसार मृतक मंगेश बागडे तसेच आरोपी राजेश पेंदाणे, व सचिण चव्हाण हे खापरखेडा परिसरात रेती तस्करी करायचे. मागील एक दीड वर्षांपूर्वी आरोपी पेंदाणे यास   माऊजरने गोळी झाडून गंभीर जखमी केले होते. या प्रकरणात मंगेश बागडे याला शिक्षा झाली होती. नुकताच शिक्षा भोगून घरी आलेल्या मृतक मंगेश आज सकाळी घरुन भानेगाव - पारशिवनी टि-पाईंट कडे पल्सर मोटरसायकल क्रमांक MH 40 AD 6979 ने गेला होता यावेळी तो अचानक वारेगावाकडे फिरायला गेला असताना त्याच्या मागावर असलेले आरोपी यांनी आपल्या बोलोरो MH40 KR1489 ने मृतकाच्या गाडीला कट मारून मृतक मंगेश यास गाडीवरून पाडले. 

घटने दरम्यान मृतकाच्या पाठलाग करताना आरोपीची बोलेरो चे संतुलन बिघडल्यामुळे एका खड्ड्यात जाऊन आदळली. दरम्यान आरोपी बोलेरो गाडीतून उतरून मंगेश च्या मागे धावत जाउन त्याला दगडाने ठेचून रक्ताच्या थारोळ्यात पाडले. या झटापटीत दोन्ही आरोपींचे माउझर हातातून पडले व त्यांनी तेथून पळ काढला.

यावेळी मार्गांनी येणा-या जाणा-यांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली. एका इंडिका कारने मंगेशला कामठी येथील एका खाजगी रुग्णालयात हलविले. परंतु  डॉक्टरांनी मंगेशला तपासले असता त्यास मृत घोषित केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.