आमदार किशोर जोरगेवार यांची
वाहन परवाना देण्याची प्रक्रीया जलद करण्याच्या सुचना
चंद्रपूर – आर.टी.ओ. विभागाबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आज आमदार किशोर जोरगेवार यांनी आर.टी.ओ. कार्यालयाला आकस्मीत भेट दिली. यावेळी नागरिकांची गैरसोय व आर.टी.ओ. कार्यालयातील शौचालय व पिण्याच्या पाण्याची दुरवस्था पाहुण आमदार जोरगेवार अधिका-यांवर चांगलेच संतापले. वाहण परवाणा काढण्सासाठी आलेल्या नागरिकांची लांब कतार पाहून वाहण परवाना देण्याची प्रक्रिया जलद करा अश्या सूचनाही यावेळी आमदार जोरगेवार यांनी दिल्यात. या प्रसंगी वाहतूक परिवहन अधिकारी विशंबर शिंदे यांच्यासह आर.टी.ओ. कार्यालयातील अधिका-यांची उपस्थिती होती.
वाहतूक परिवहन कार्यालयासंबधित अनेक तक्रारी असतात त्यामूळे आज कोणालाही पूर्व सूचना न देता आमदार किशोर जोरगेवार यांनी आज परिवहन वाहतूक विभागाच्या कार्यालयाला आस्कमीत भेट दिली. यावेळी येथे विविध कामा करिता आलेल्या नागरिकांनी येथील कारभाराबाबतचे कथन आमदारासमोर मांडले, यावेळी पिण्याच्या पाण्याच्या ठीकाणी अस्वच्छता बघुन आमदार अधिका-यांवर चांगले संतापले. येथील अतिशय घाण अवस्थेत असलेले शौचालय पाहताच जोरगेवारांनी अधिका-यांना शौचालयाची दुरावस्था लक्षात आणून दिली तसेच या ठिकाणी स्वच्छता ठेवण्याच्या सूचना जोरगेवारांनी दिल्यात. आर.टी.ओ. कार्यालयात वाहक परवाना काढण्याकरीता नवशिख्या वाहन चालकांची मोठी गर्दी होती. अधिकारी ठरविलेल्या वेळेवर येथे येत नसल्यामूळे वाहन परवाणा काढण्यासाठी आलेल्यांना नाहक त्रास सहण करावा लागत असल्याचे लक्षात येताच येथे कर्मचा-यांची सख्या वाढत परवाना देण्याची प्रक्रिया जलद करण्याच्या सूचना आमदार जोरगेवार यांनी यावेळी अधिका-यांना दिल्यात यात महिलांना प्राधान्य दिले जावे, अशी सुचनाही जोरगेवार यांनी केली. आर.टी.ओ. कार्यालयाच्या पाहणी दरम्याण अधिका-यांच्या कार्यालयातील कर्मचा-यांच्या अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यामूळे जोरगेवार यांनी हजेरी बुक मागवत हजर कर्मचा-यांच्या उपस्थितीबाबत सहानिशा केली.
एकंदरीतच वाहतूक परिवहण विभागातील गैरसोई बघून आमदार जोरगेवार तेथील अधिका-यांवर चांगलेच संतापले जनतेच्या तक्रारीवर तातडीने लक्ष देत जनतेचे प्रश्न सोडवावे येथे येणारा व्यक्ती बरोबर योग्य वागणूक करावी. अश्या सूचनाही यावेळी आमदार जोरगेवार यांनी दिल्यात.