Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, डिसेंबर २८, २०१९

भाऊसाहेबांचा आदर्श आचारणात आणा:राजश्रीताई मुंदाफळे

द्रुगधामना हायस्कूल मध्ये डॉ .पंजाबराव देशमुख जंयती महोत्सव
नागपूर / अरुण कराळे:

शेतकऱ्यांच्या व्यथांची जाण असणारे आणि सामान्य माणसापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचविणारे भाऊसाहेब उपाख्य डॉ .पंजाबराव देशमुख यांचे नेतृत्व व कर्तृत्वाचा अभ्यास करावा,भाऊसाहेब यांनी कृषिलवाद कायद्याच्या माध्यमाने शेतकरी कर्जमाफी केली तसेच सावकारी पाशातुन शेतकऱ्यांच्या जामिनी मुक्त केल्या . त्यामुळे त्यांनी प्रस्थापित केलेले आदर्श आचरणात आणावे असे प्रतिपादन डॉ .पंजाबराव देशमुख स्मृती शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षा राजश्रीताई मुंदाफळे यांनी केले .

दवलामेटी येथील द्रुगधामना हायस्कूल , आदर्श कला, वाणिज्य, एच.एस.सी. व्होकेशनल कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त सहकार्याने शुक्रवार २७ डिसेंबर रोजी डॉ . पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख जंयती महोत्सव व वार्षीक क्रिडा व विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण पार पडले . त्यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या . 

सर्वप्रथम डॉ .भाऊसाहेब देशमुख व संस्थेचे संस्थापक कार्याध्यक्ष शिक्षणरत्न प्राचार्य स्व .मधुकरराव मुंदाफळे यांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले . मंचावर प्राचार्य सुरेंद्र मोरे, पर्यवेक्षक वसंत हरले प्रामुख्याने उपस्थित होते . देवस्थान विधेयक सादर करून त्यांनी देशातील लाखो मंदिरातील संपत्ती ही शेतकरी व शिक्षणापासून वंचितासाठी खर्च करण्याचा प्रयत्न केला .

रंतू त्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले नाही सुखी शेतकरी आणि सर्वांसाठी शिक्षण या ध्येयाने डॉ . भाऊसाहेब देशमुख यांनी जिवनभर कार्य केले असे प्रतिपादन प्राचार्य सुरेंद्र मोरे यांनी केले .या प्रसंगी विद्यार्थ्याचे पुष्प सजावट , रांगोळी स्पर्धा , विज्ञान प्रदर्शनी , वर्ग सजावट , चित्रकला स्पर्धा , सलाद सजावट , बौद्धीक स्पर्धा , स्वयंस्फुर्त भाषण स्पर्धा , वादविवाद स्पर्धा , गीत गायन स्पर्धा , प्रश्नमंजुषा, क्रिडा स्पर्धा आदी कार्यक्रम घेण्यात आले . प्रास्ताविक प्रा . सुरेंद्र मोरे , संचालन पुष्पा सोमकुवर , आभारप्रदर्शन प्रा . गजानन काकड यांनी केले . आयोजनासाठी प्रा .अविनाश चौधरी , प्रा . बाबुलाल मोरे, प्रा . दिलीप आजनकर , प्रा .नंदकिशोर भोयर , प्रा .आविनाश बारब्दे ,प्रा .विलास मोहोड ,अरूण कराळे, लक्ष्मण खडसे, अशोक राऊत, प्रकाश मस्के ,प्रा .प्रगती पाचपोहर, प्रा . ज्योती किरणापूरे, प्रा . जयश्री वाढई , मंदा फालके,आरती भोरे , ज्योती अढावू , सुनीता चव्हाण , वंदना मुसळे , वैशाली लोही , वंदना जाभुंळकर , नरेंद्र शेळके ,विलास मुसळे ,विलास चौधरी , नामदेव खोपे ,लक्ष्मण शिंदे, बंडू मोहोड , मंजु शिंदे ,नामदेव राऊत, शंकर राऊत आदींनी सहकार्य केले .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.