नागपूर/प्रतिनिधी
माहे डिसेंबर2019 पेड इन जानेवारी 2020 चे जि प प्राथमिक शिक्षकांचे वेतन देयक शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन तयार करून 14 डिसेंबर पर्यंत जिल्हा परिषद मध्ये सादर करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी व जि प माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांना दिले आहेत.
मात्र काही गट शिक्षणाधिकारी हेतुपुरस्सर जि प प्राथमिक शाळेच्या मुख्यध्यापकांना वेठीस धरून शाळा स्तरावर ऑनलाइन देयके तयार करण्यासाठी दबाव टाकत आहेत.
जि प प्राथमिक शिक्षकांची सर्व सेवाविषयक आस्थापना, सेवा पुस्तके, रजा मंजुरी, वेतनवाढ मंजुरी इत्यादी बाबी गट शिक्षणाधिकाऱ्यांचे अधिकार क्षेत्रात येत असून वेतन लिपिक सुद्धा उपलब्ध आहेत.
त्याउलट परिस्थिती प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांकडे शिक्षकांची कुठलीच सेवाविषयक बाबी मंजूर करण्याचे अधिकार नसून संगणक, प्रिंटर, इंटरनेट सुविधा व लिपिक उपलब्ध नसून वेतन देयके तयार करण्यासाठी आर्थिक अनुदान सुद्धा उपलब्ध नाही.
सदर बाब लक्षात घेऊन शालार्थ ऑनलाइन पगार देयके पंचायत समिती कार्यालयातच तयार करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षण शिक्षकेतर सेनेचे राज्य सरचिटणीस शरद भांडारकर, संजय चामट, मनोज घोडके, प्रवीण मेश्राम, नंदकिशोर उजवणे, दिपचंद पेनकांडे, प्रभाकर काळे,अशोक डाहाके, नारायण पेठे, मोरेश्वर तडसे, भावना काळाने इत्यादींनी केली आहे.