आम आदमी पार्टीतर्फे अॅङ पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन
तालुका प्रतिनिधी/सिंदेवाही
जिल्हा पाणीपुरवठा योजनेअंतर्गत कंत्राटी कामगारांना वेतनवाढ करण्याच्या मागणीचे निवेदन
आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र राज्य सदस्या अॅङ. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अभियंता ग्रामिण पाणीपुरवठा योजना, सिंदेवाही यांना देण्यात आले.
जिल्हा पाणीपुरवठा योजनेअंतर्गत काम करणारे कंत्राटी कामगार मागील दहा ते पंधरा वर्षापासून काम करित असतांनाही त्यांना अत्यल्प वेतनावर काम करावे लागत आहे . ठेकेदारामार्फत काम करीत असल्याने एकही कामगारांना कायदेशीर किमान वेतन देण्यात येत नाही आहे. याशिवाय कामगारांनी त्यांचे इतर हक्क उदा. आयडी कार्ड , युनी फार्म इत्यादी देण्यात नाही . २०१५ मध्ये कामगार आयुक्तांनी बँकेमार्फत पगार देण्याचे आदेश दिल्यानंतरही बँकेमार्फत पगार दिले जात नाही . हे सर्व बाबी अत्यंत गंभीर असून , आपण जातीने लक्ष द्यावे, अशी मागणी अॅङ. पारोमिता गोस्वामी यांनी यावेळी केली.
जिल्हा पाणीपुरवठा विभागाचे कंत्राटी कामगारांना किमान वेतन तसेच इतर सोयी प्राप्त करून देण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली.
यावेळी पारोमिता ताई गोस्वामी, विजय सिध्दावार, राजेन्द्र सहारे , घनश्याम मेश्राम, मनोहर पवार, अनिल मडावी, शशिकांत बतकमवार शांताराम आदे, अशोक निमगडे, रविन्द्र नैताम, सुनिल गनविर, प्रमोद चौधरी, मनोज पोटे यांची उपस्थिती होती.