सिंदेवाही- संविधानाने सर्वाना मोफत व सक्तीचे शिक्षनाचा अधिकार दिलेला आहे परंतु हा अधिकार जाणीवपूर्वक हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. सक्तीचे शिक्षण आहे पण मोफत शिक्षण नाही ही संकल्पना राबविण्यात येत असल्याचे विचार प्राध्यापक चंद्रमनी घोनमोडे यांनी व्यक्त केले. ते सर्वोदय कन्या विद्यालय येथे संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्राचार्या कु संगीता यादव यांनी भूषविले. यावेळी पर्यवेक्षक श्री भाऊराव दडमल, कु कांता भेंडारकर, शालेय मुख्यमंत्री कु प्रियंका हटवादे यांची उपस्थिती होती.
संविधानातील मूलभूत अधिकार व कर्तव्ये देशाच्या विकासाला हातभार लावणारे आहे, संविधानात भारत हे देशाचे नाव आहे पण काही लोक जाणूनबुजून हिंदुस्थान उच्चार करतात, अन्याय व शोषणाविरुद्ध आवाज उठविण्याचा स्वातंत्र्य दिलेले आहे, ज्ञाना शिवाय स्वातंत्र्य उपभोगता येत नाही, न्याय मिळविण्यासाठी इतरांवर अन्याय करून चालणार नाही, असेही ते म्हणाले.
कार्यक्रम अध्यक्ष कु संगीत यादव यांनी अधिकारासोबत कर्तव्य सुध्दा विद्यार्थ्यांनी जोपासना करावी, देशावर प्रेम करणारेच चांगले नागरिक होतात असे सांगितले. कु कांता भेंडारकर, कु हतवादे यांनी विचार व्यक्त केले. आभार कु प्रियंका दांडेकर तर प्रास्तविक कु मेघा बोरकर हिने केले.