Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर २८, २०१९

’कृषी व ग्रामीण क्षेत्रासाठी शासकीय पुढाकार’’ मल्टीमिडिया चित्रप्रदर्शन




केन्‍द्रीय मंत्री मा. नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते उद्घाटन
नागपुर- भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्‍या प्रादेशिक लोक संपर्क ब्‍यूरो, (महाराष्ट्र व गोवा प्रदेश) यांच्या वतीने रेशीमबाग ग्राउंड, नागपुर येथील स्टॉल नंबर D79 व D81 मध्ये 11 वे अँग्रो व्हिजन निमित्ताने कृषी व ग्रामीण क्षेत्रासाठी शासकीय पुढाकार या विषयावर मल्टीमिडिया चित्रप्रदर्शनाचेआयोजन करण्यात आले होते. एग्रोविजन चे मुख्‍य कार्यक्रमाच्‍या उद्घाटनानंतर सायंकाळी मा. श्री नितीनजी गडकरी, रस्ते वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, जहाजबांधणी मंत्री. यांच्‍या हस्‍ते या मल्टीमिडिया चित्रप्रदर्शनाचे दिनांक 22 नोव्हेंबर 2019 रोजी फित कापूनउदघाटन करण्‍यात आले.

उद्घाटन सत्रानंतर प्रदर्शनीत लावण्यात आलेल्या स्टॉल्सला सुद्धा गडकरी यांनी भेट दिली. माहिती प्रसारण मंत्रालयाच्या लोक संपर्क ब्युरोच्या ‘केंद्र सरकारच्या कृषी व ग्रामीण भागातील धोरणाविषयीच्या’ माहिती प्रदर्शनाचे उद्घाटनही त्यांनी यावेळी केले. 22 ते 25 नोव्हेंबर दरम्यान चालणाऱ्या चार दिवसीय कार्यशाळेच्या दरम्यान विविध कार्यशाळा परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.  उद्घाटन कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी, कृषी व संशोधन संस्थांचे पदाधिकारी, केंद्र व राज्य शासनाचे विभागातील अधिकारी व देशातील विविध भागातून आलेले शेतकरी उपस्थित होते

या प्रसंगी क्षेत्रीय लोक संपर्क ब्‍यूरो नागपूरच्‍या सहायक संचालिका श्रीमती मीना जेटली, क्षेत्रीय औरंगाबादचे सहायक संचालिक श्री निखील देशमुख, तांत्रिक सहायक श्री संजय तिवारी, सहायक, प्रदिप पवार आणि श्रीमती संजीवनी निमखेडकर उपस्‍थित होते. या प्रदर्शनीला पत्र सूचना कार्यालयाचे सहायक संचालिक श्री शशीन राय, आकाशवाणी, नागपूरच्‍या सहायक संचालिका श्रीमती गौरी मराठे, सहायक संचालक श्री मनोज सोनोने आणि अनेक मान्‍यवरांनी भेट दिली.

ह्या मल्टीमिडिया प्रदर्शनात अत्याधुनिक तंत्रज्ञान जसे मोठ्या एलईडी स्क्रिन, एलडीई पैनल, प्लाज्मा टीवी, आभासी वास्तविकता, वर्धित वास्तविकता, सेल्फी कॉर्नर, फ्लिप बुक, टीवी वर गेम्स सह ग्रामीण जीवन पद्धतिची सेटअप च्या माध्यमातून कृषी व ग्रामीण क्षेत्रातील केंद्र सरकारच्या विविध योजनांवर माहिती मिळणार आहे. ही चित्रप्रदर्शनी दिनांक 22 ते 25 नोव्हेंबर 2019 या कालावधित सकाळी 10 ते संध्या. 07 या वेळेत सर्वांसाठीविनामूल्य चालू राहणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहून संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केंद्र शासनाच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो,नागपुर तर्फे करण्यात आले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.