Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, नोव्हेंबर १६, २०१९

भोई - ढिवर कहार समाजाचा वर-वधू परिचय मेळावा रविवारी




नागपूर/प्रतिनिधी
 दरवर्षीप्रमाणे यंदाही याही वर्षी भोई - ढिवर कहार समाजाचा वर वधु परिचय मेळावा, गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचा-यांचा सत्कार दि . १७ / ११ / २०१९ रोज रविवार वेळ ११ वाजता स्थळ : - अजंता हॉल , टाटा हाइंट्स समोर , मेडिकल रोड , बैद्यनाथ चोक जवळ, नागपूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. 
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम राहतील. तरी भोई - ढिवर कहार समाजातील युवक युवती, समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन  दिलीपराव कैलुके (संघटन सचिव ९८५०५६३६२८) यांनी केले आहे. 


भोई विद्यार्थी संघटना , नागपूर द्वारा पुरस्कृत  संघर्ष भोई ठिवर समाज कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था , नागपूर, भोई समाज महिला बहुउद्देशीय संस्था, भोई - ढिवर कहार समाज वधु - वर परिचय मेळावा , गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा रविवार दि. १७ / ११ / २०१९ सकाळी ११. वाजता स्थळ : - अजंता हॉल , टाटा हाईटस समोर , मेडीकल रोड , बैधनाथ चौकाजवळ , नागपूर होत आहे. 
गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार : सकाळी ११ ते दुपारी १२ : ३० पर्यंत, वधु - वर परिचय मेळावा : दुपारी,  समाज विकासाचे दृष्टीने सामाजिक प्रबोधन , प्रतिभावंताचा सन्मान , भोई ठिवर , कहार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार तसेच उपवर - वधु परिचय मेळाव्याचे भव्य आयोजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येत आहे . ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सत्र मार्च २०१९ वर्षी नागपूर विभागातून वर्ग १० मध्ये ७० % व वर्ग १२ मध्ये ६५ % गुण प्राप्त व पदविका , पदवी , पदव्युत्तर ६० % गुण प्राप्त केले असतील त्यांचा सत्कार होईल.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.