नागपूर/ललित लांजेवार:
भाजप आणि शिवसेना यांच्यात आतापर्यंत सत्तास्थापनेबाबत एकमत झालेले नाही. दोन्ही पक्षांकडून मुख्यमंत्री पदावर दावा सांगण्यात येत आहे.अश्यातच सोमवारी फडणवीस भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे गेले होते,अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्ली येथे थांबले होते मात्र मोदी-फडणवीस भेट होऊ शकली नाही.
शिवसेना आपल्या मतावर ठाम राहिल्याने राज्यात भाजपला एकट्याच्या बळावर सत्ता स्थापन करणे शक्य झालेले नाही.
राज्यातील राजकीय समीकरणे सतत बदलताना अपेक्षे पेक्षा मिळालेल्या कमी जागा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सत्ता स्थापनेतील प्रोब्लेम असल्याचे भाजप वरिष्ठाच्या ध्यानात आले. त्यामुळेच उपमुख्यमंत्रिपदासाठी फडणवीस यांच्या जागी अन्य नेत्याचे नाव चर्चेत आहे ,
यात विदर्भातून काही आमदार व नेत्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची फिल्डिंग लावली आहे तर चंद्रकांत पाटील,गिरीश महाजन यांचे देखील नाव मुख्यमंत्री पदासाठी भाजपच्या दुसऱ्या गटाने समोर केले आहे अशी माहिती आहे,
मुख्यमंत्री बदलण्याची पक्ष श्रेष्टी हिमंत दाखविणार का? हाही एक महाराष्ट्रपुढे प्रश्न आहे. जर दाखवतील तर मुख्यमंत्री म्हणून संभाव्य नावे हे खालीलप्रमाणे समोर येऊ शकतात.
जर नितीन गडकरी यांच्या नावाचा विचार केला तर त्यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान केंद्र सोडून राज्यात येण्याची माझी इच्छा नाही,मी केंद्राच्या कामातच खुश असल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे त्यांचे नाव जास्त रंगू शकत नाही.
राजकारणाचा दांडका अनुभव असलेले व निर्णायक असे चंद्रपूरचे सुधीर मुनगंटीवार यांचे नाव देखील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे,विदर्भातील कोणत्याच नेत्याला या नावाला विरोध नाही तर चंद्रकांत दादांसाठी या नावाला विरोध होऊ शकतो मात्र अमित शहा, नितीन गडकरी आणि पक्षातील अन्य नेते यांना मान्य असलेले हे नाव असल्याने सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची शक्यता आणखीन वाढेली आहे.
तर चंद्रकांत पाटील देखील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याने जर भाजपचा मुख्यमंत्री बसला तर अमित शाह यांचे जवळचे समजले जाणारे चंद्रकांत पाटील देखील या स्पर्धेत समोर आहेत,मात्र शाह यांच्या एका क्लिकवर चंद्रकांत पाटील यांचे नाव पुढे येऊ शकते. तर भाजपच्या काही नेत्यांकडून या नावाला विरोध केला जाईल त्यामुळे अमित शहा व मोदींची मुख्यमंत्री बदलण्याची इच्छा असेल महाराष्ट्रात कोणा नावावर शिक्कामोर्तब होईल ? याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.
दिल्लीत शाह-फडणवीस यांच्यात झालेल्या ४० मिनिटाच्या चर्चेत शाह फडणवीस यांच्या समाधानकारक चर्चा झाली नसल्याचे दिल्लीच्या माध्यमात चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी जागांच्या वाटपासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यात बैठक झाली.होती. या बैठकीत सत्तेचं समसमान वाटप करु, यावर दोन्ही पक्षांनी संमती दर्शवली होती.असा शिवसेनेचा दावा आहे.ही मागणी भाजपने अमान्य केल्यामुळे दिवसेंदिवस अडचण वाढत आहे,अश्यातच 'सामना'मधील अग्रलेखद्वारे शिवसेनेने पुन्हा एकदा भाजप आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे.
काय म्हटलंय आग्रठेखात?
बहुमताचा आकडा गोळा करण्यात पुढचे चारेक दिवस जातील, पण ती कसरत म्हणजे दिल्लीच्या गढूळ धुक्यात विमान उतरवण्यासारखेच आहे.गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान मोदी एका बाजूला, तर दुसरीकडे शरद पवार हे सोनिया गांधी यांना भेटून नक्की काय जुळवाजुळव करतात ते पाहणेरंजक ठरेल. महाराष्ट्रात लवकरात लवकर नवे सरकार स्थापन होणे हे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, तितकेच ते राज्यातील जनतेसाठी महत्त्वाचेआहे. लोकांचा तो अधिकार आहे, पण सत्तास्थापनेचा घोळ घालायचा, खोळंबा करायचा व त्या परिस्थितीचा लाभ घेऊन सरकार नसतानाही अप्रत्यक्ष सूत्रे हातात ठेवून राज्यकारभार हाकायचा हे घटनाविरोधी आहे. नवे राज्य मोकळय़ा वातावरणात यावे, पण एकदाचे राज्य यावे हीच अपेक्षा आहे.
फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवू नका
हॅशटॅग वापरुन नेटिझन्स देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवू नका अशी मागणी महायुतीकडे करत आहेत.
निवडणुकीपूर्वी अनेक प्रचारसभांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मीपुन्हा येईन, मी पुन्हा येईन'चा नारा दिला होता. परंतु महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये मंत्रीपदांचं वाटप करण्यात फडणवीस अपयशी ठरले आहेत.त्यामुळे आता फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या शक्यता काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. तसेच कालपासून ट्रिटरवरुनदेखील अशाच प्रकारची मागणी होत आहे.