उमेश तिवारी/कारंजा (घाडगे):
(हेटीकुंडी येथील गावकऱ्यांन सोबत वनविभागाने केली शोधमोहीम.)
कारंजा (घाडगे) तालुक्यातील हेटीकुंडी येथील गुराखी चिंतामण श्रीरामे वय ५५ वर्षे हा गावातील जनावरे चारण्याचा व्यवसाय करतो, नेहमी प्रमाणे काल दि. २९/१०/२०१९ ला चिंतामण श्रीरामे या गुराख्याच्या जावयांने सकाळी जगलांत जनावरे चारायला नेली,
दुपारी १२ वाजता च्या दरम्यान गुराखी चिंतामण श्रीरामे चा जवाई भास्कर मडावी वय ३५ वर्षे घरी परत आला व नंतर चिंतामण श्रीरामे जगलांत जनावरे चारण्यास गेला परंतु जनावराकडे न जाता जगलांत त्याने अति मद्य प्राशन केले जनावराकडे गेला नसल्याने ३ ते ४ वाजतापासून जनावरे घरी परत येऊ लागली. रात्री गुराखी चिंतामण घरी परत न आल्याने कुटुंबातील सदस्यांनी ही बाब शेजाऱ्यांना व गावकऱ्यांना सांगितली.
त्यामुळे रात्री १० वाजता पासून गावकऱ्यांची चिंता वाढत गेली, हेटीकुंडी या परिसरात वाघाची सतत वर्दळ असल्याने, तसेच गावाला जगलं लागून असल्याने गावकरी चिंतामण वर वाघाने हल्ला तर केला नाही ना हा प्रश्न गावकऱ्यांच्या मनात आला असता या शंकेने (भीतीने) जगलं पाहण्याकरिता (फिरायला) लागले ही माहिती वन विभागाला कळताच वन विभागाचे कर्मचारी सुद्धा ५ ते ६ तुकड्या बनवून रात्रभर गावकऱ्या सोबतच जगलांत गुराख्याच्या शोधात फिरत होते परंतु गुराख्याच्या शोध लागला नाही.
आज सकाळी हेटीकुंडी गावात दवंडी देण्यात आली व जगलांत जनावरे नेऊ नये, सर्वांनी गुराख्याच्या शोधात यावे असे सांगण्यात आले. आज सकाळपासुन गावकरी व वन कर्मचारी गुराख्याच्या शोधात असतांना डेरिफॉर्म परीसरात लावलेल्या कॅमेरात रात्रीच्या वेळस वाघ फिरत असल्याचे दिसले त्यामुळे एवढ्यातच गुराख्यावर हल्ला झाला असावा असा ठाम विश्वास गावकऱ्यानां झाला.
गावकरी फिरत असतांना गुराखी अखेर नागपूर येथील मुडे नामक शेतकऱ्याच्या बंगल्यात (जगलांत असलेला) मद्यधुंद अवस्थेत झोपलेला जिवंत आठळला. तेव्हा त्या गुराख्याने मी दारू पिल्याने गावांत रात्रीला वाघाच्या भीतीने येऊ शकलो नाही असे तो सांगत होता. अखेर गावकऱ्यानी सुटकेचा दम सोडला. सर्व वन कर्मचारी, गावकरी यांनी रात्र जागून काठली.