वणी : जिल्हा पुलीस उप अधीक्षक नरुल हसन यांनी दि २७ आगष्ठ ला वणी पुलिस स्टेशन ला पोळा, गणेशोत्सव, दुर्गोत्सव,मोहरम, विधानसभा याबाबत व्यवस्था व समस्या जाणुन घेण्यासाठी आले असता पत्रकारांशी संवाद साधला या दरम्यान पत्रकारांनी परीसरातील परीस्थिती शी संबंधित समस्या , बंद पुलीस चौकी व पुलिस वसाहती बाबत जोरदार चर्चा केली
वणी पुलिस स्टेशनच्या निर्मिती दरम्यान पुलिस वसाहती ची निर्मिती करण्यात आली याला जवळपास 70वर्षाचा कालावधी झाला असेल या काळात या वसाहती व त्यातील शौचालये पुर्णपणे जीर्ण व कालबाह्य झालेली आहेत तर वसाहतीत काही निवासस्थाने खंडहर झाल्यात जमा आहे याचा बहुतांश परीसर हि काटेरी झाडेझुडूप,गाजर गवत व जमा करण्यात आलेल्या वाहनांनी व्यापलेला असुन येथे मोठ्या प्रमाणात घाण पसरलेली असते तर परिसरातील खंड झालेले निवास,झुडपे,जमा वाहने या मुळे डास,पाली,विचु यांचा मुक्त संचार दिवसेंदिवस वाढतच असून यामुळे व जिर्ण इमारतीतील परीवाराला जिवमुठीत धरुन जिवन जगने नाइलाजास्तव भाग पडत आहे
शहरातील कायदा सुव्यवस्था व शांतता प्रस्थापित करण्याचा भार पुर्वी पुलिस स्टेशन सह बसस्थानक परिसरातील चौकी,शामटाकिज चौकी, रंगनाथस्वामी मंदिर परिसरातील चौकीवर होता परंतु तुटपुंज्या कर्मचाऱ्यांमुळे या तिन्ही चौक्या क्रमाक्रमाने बंद करण्यात आल्या
बस स्थानक चौकी अतंर्गत ग्रामिन रुग्णालय, गुरुवर्य कालनी,जैताई मंदिर, रेल्वे स्टेशन, बायपास व बसस्थानक परिसर येतो वणीचे बसस्थानक नेहमी प्रवाशांनी गजबजलेले असते येथे विद्यार्थीनी छेडछाड,पाकिटमारी या प्रकरासह शेजारच्या जिल्ह्यांतील येणाऱ्या मधपी कडून विद्यार्थ्यांना व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे त्यामुळे येथे चौकी असणे तितकेच महत्वाचे आहे
श्याम टॉकीज चौकी परिसरात वणी शहरातील मुख्य बाजार गांधी चौक नगर परिषद भाजी मंडी, सिनेमागृह जनता हायस्कूल, विवेकानंद हायस्कूल या सारखा भाग येतो गांधी चौक मुख्य बाजारअसल्याने या ठिकाणी सर्व जीवनावश्यक वस्तू किराणा कपडा सोने-चांदी व इतर सर्व प्रकारची प्रतिष्ठाने असल्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत नागरिकांची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते खरेदीसाठी मोठ्या रकमा घेऊन वणी, मारेगाव झरी व शेजारील चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना, राजुरा, चंद्रपूर,वरोरा, भद्रावती तालुक्यातील नागरिक या ठिकाणी येतात तसेच भाजीमंडी मध्ये व सिनेमागृह आकडे जाणाऱ्या या परिसरात मोठी गर्दी असते विवेकानंद हायस्कूल लोकमान्य टिळक महाविद्यालय तसेच इतर शाळांमध्ये जाणारे विद्यार्थी या मार्गाने मोठ्या प्रमाणात शाळेत जाणे-येणे करत असते चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात झालेले आहे त्यामुळे याठिकाणी पोलीस दादाची उपस्थिती गरजेची झाली आहे
रंगनाथ स्वामी मंदिर परिसरातील (दिपक टॉकीज) चौकी शहरातील अतिशय संवेदनशील चौकी म्हणुन पोलिस दप्तरी नोंद आहे यात शास्त्रीनगर, रंगनाथ नगर, खळबळा गोकुळनगर,प्रेमनगर,हा गुन्हेगारांनी भरलेल्या वार्डाचा समावेश यात असुन या वार्डातील गुन्हेगारी प्रवृत्ती कडून लुटपाट, घरफोडी, भंगार चोरी, अवैध दारुविक्री,गांजा व अफ्फुची विक्री,वरलीमटका, जुगार, मारामारी, शसस्त्र हल्ले, देहव्यापार यासारखे असामाजिक कामे दिवसाढवळ्या होत असुन दिवसेंदिवस यात मोठी वाढ झाली आहे
लगतच्या राज्यातील पोलिसांकडून प्रेमनगर परीसरात अनेकदा कारवाई करत आंतरराज्यीय गुन्हेगार याठिकाहून पकडलेआहे तसेच वणी पोलिसांनीसुध्दा अनेकदा मोठमोठ्या गुन्हेगारांना कोठडी दाखविली व अल्पवयीन मुलीला अनेकदा सोडवणुक करुन त्यांना देहव्यापारात ओढणार्यावर कारवाई केली आहे
पोलिसांनी नुकतीच सात अल्पवयीन मुलांवर चोरीच्या आरोपात व गोहत्या प्रकरणी कारवाई करुनअटक केली ते याच परिसरातील आहे
शहरातील या बंद तिनही पोलिस चौक्या पुर्वीप्रमाने सुरु झाल्यास चौकी परिसरातील अवैध धंद्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल व प्रसंगी पोलिसाची चौकी मदतीला आहे
या एका आशेवर सर्वसामान्य व प्रतिष्ठित नागरिक बिनधास्त जिवन जगेल या दोन्ही विषयावर जोरदार व सकारात्मक चर्चा झाली
चर्चेत शेवटी रस्त्यावरील मोकाट जनावरांपासून होणारे धोके व विस्कळलेली वाहतूक व्यवस्थेचा विषय उपस्थित झाला
एएसपी महोदयांनी जिल्हा पोलिस अधीक्षक राजकुमार समोर ठेवून प्रश्र्न मार्गी लावण्याची हमी दिली व सणासुदितच व नेहमी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याची अपेक्षा केली
यावेळी वणीचे एस,डि,पी,ओ, सुशीलकुमार नायक, ठाणेदार वैभव जाधव,स,पो,नि,मुर्लिधर गाडामोडे, विजयमाला रिठे, गोपाल जाधव, वाहतूक शाखेचे नंदकुमारआयरे प्रफ्फुल डाहुले हे अधिकारी उपस्थित होते
बैठक व्यवस्था बिट जमादार सुदर्शन वानोडे ,रत्नपाल मोहाडे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे यांनी केली पोलिस विभागाने उपस्थित पत्रकारांचे आभार मानले तर पत्रकारांनी एएसपी साहेबांना प्रथम आगमना निमित्त पुष्पगुच्छ भेट केले