वणी- आजच्या युगात थोडासा परीसर स्वच्छ करुन मोठे समाजकार्य केल्याचं प्रदर्शन करणारे व त्यातून प्रसिध्दी मिळविणारे अनेक आहे तर कसलाही हेतू न बाळगता गाडगेबाबा चा वारसा चालविणारे लाठी या गावातील महादेवराव दोरखंडे निरंतर ग्राम स्वच्छता करीत असून भल्याभल्यां समोर आदर्श निर्माण करीत आहे
वणी शहरापासून केवळ दहा किलोमीटर अंतरावरील लाठी हे गाव लोकसंख्या जेमतेम 900च्या घरात याच गावातील दोरखंडे काका मुळात धार्मिक वृत्तीचे गावातील स्वच्छतेचे काम कसली अपेक्षा न बाळगता वयाच्या पंच्यातरीत तितक्याच दिमाखात सातत्याने करतात गावात सण,उत्सव असो वा सामाजिक उपक्रम हा स्वच्छतादुत आपले काम चोख बजावतो
नुकताच गाव खेड्यात मोठ्या प्रमाणावर हर्ष उल्हासात साजरा होणारा पोळ्याच्या सण लाठी गावातील मारोतीच्या पाराजवळ मोठ्या प्रमाणात भरला शेतकऱ्यांनी आपल्या सर्जाराज्याला रंग मटकी, बेलाचे चौर ,झुली, बेगड ,हारतुरे लावुन मोठ्या थाटामाटातबैंडबाज्याच्या गजरात आंब्याचीपाने व पताकाच्या तोरणाच्या मागे रांगेत उभे केले गावातील सर्व शेतकरी, लोकप्रतिनिधि, युवक महिलांनी एकच गर्दी केली सायंकाळ झाली सुर्यास्त होता होता सर्व बैलजोड्यावर गुडी फिरली व पोळा सुटला सगळे घरी निघून गेले तर याठिकाणी उरले फक्त दोरखंडे काका व अस्तव्यस्त पडलेली बेलपत्र,फुले कागद,खर्रापन्नी, गुटखा तंबाखूच्या पुड्या,आशा विविध वस्तू ज्यामुळे मारोती चे मंदिर व परीसर घाणेरडा झाला. काकांनी पारावरुनच हा प्रकार पाहिला व हातात खराटा घेऊन अवघ्या काही क्षणातच मंदिरांसह संपूर्ण पोळ्याचा परिसर स्वच्छ करुन परत एकदा आपल्या सामाजिक कार्य मुकाट्याने पारपाडत आपली हा वारसा गावासमोर ठेवला काकाचे कार्य अतुलनीय असुन आज त्यांचा आदर्श घेऊन काम केल्यास गाडगेबाबा च्या स्वप्नातील स्वस्थ गावं स्वच्छ गावं असे प्रत्येक गाव दिसल्याखेरीज राहनार नाही काकांचे कार्याला त्रिवार मुजराही कमी पडतो आहे