श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी सूचविल्या सूचना
चंद्रपूर/प्रतिनिधी
ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा परिसरात मागिल ४-५ वर्षापासुन वाघ, बिबट, रानडुक्कर यांचे हल्ले वाढले. या हल्यात या परिसरात वनप्राण्याच्या हल्यात शेकडो शेतकरी, मजूर, बालके, गुराखी यांचे नाहक बळी गेले. वन्यप्राण्याच्या दहशतीमुळे शेती करणे दुरापास्त झाले. या वन्यजीव नुकसानीवर श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी सूचना सूचविल्या.
मुंबई येथील मंत्रालयात प्रधानसचिव विकास खारगे यांचे सोबत श्रमिक एल्गारची बैठक पार पडली. या बैठकीत श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी अनेक समस्यांवर प्रकाश टाकला. बैठकीत वन्यप्राण्यापासुन होत असलेल्या हल्यावर सखोल चर्चा करण्यात आली.
वन्यजीवामुळे या सर्व प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी "श्रमिक एल्गार" च्या माध्यमातून दिनांक १५ फेब्रवारी २०१९ ला मौजा हळदा येथे या परिसरातील ५००० लोकांच्या उपस्थितीत "मानव हक्क परिषद"घेण्यात आली. यावेळी माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे, अॅड. पारोमिता गोस्वामी, उच्च न्यायालयातील अधिवक्ता अॅड. निरज खांदेवाले, वनविभागाचे अधिकारी, सरपंच यांच्या उपस्थितीत यावर उपाय सुचविण्यात आले. श्रमिक एल्गारने हळदा ठरावातून शासनालाला मानवाच्या संरक्षणाबाबत सुचविले होते.
याबाबत मंत्रालयात प्रधानसचिव विकास खारगे यांचे सोबत एक तास बैठक झाली. या बैठकीत वन्यप्राण्यापासुन झालेल्या जखमींना अत्यल्प मोबदला व वर्षानुवर्षे उपचारावर होत असलेला खर्च यात ताळमेळ बसत नसून, जखमींचा कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात यावा, असे बैठकीत सुचविले. शेतीची नुकसानभरपाई मिळण्यास होत असलेली दिरंगाईवर उपाययोजना करावी, गावात वन्यप्राणी येवू नये यासाठी संरक्षणात्मक सोय करावी, सरपणासाठी उपाय योजना करावी, यासह विविध सुधारणा करण्याबाबत सुचविण्यात आले. प्रधान सचिव यांनी वन्यप्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी शंभर कोटीची तरदुत होत असून ब्रम्हपुरी तालुका प्राधान्यक्रम असणार असल्याची माहीती बैठकीत दिली.
वनालगत असलेल्या नागरिकांच्या हितासाठी अनेक सकारात्मक उपाय सुचविल्याने प्रधान सचिव यांनी अॅड. गोस्वामी यांचे बैठकीत आभार मानले. वन्यप्राणी व मानव यांचा संघर्ष कमी करण्यासाठी धोरनात्मक बदल करण्याचे आश्वासन प्रधानसचिव यांनी बैठकीत असलेल्या कार्यकर्त्यांना दिले. होमगार्डच्या धर्तिवर युवकांना रोजगार व गावकऱ्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी योजना आखावी असेही अॅड. गोस्वामी यांनी सुचविले आहे. यावर सकारात्मक निर्णय होणार असल्याची ग्वाही प्रधानसचिव खारगे यांनी दिली. या बैठकीत श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष विजय सिद्धावार, महासचिव घनशाम मेश्राम, तालुका आध्यक्ष शशिकांत बदकमवार, संजय लोणारे, सचिन बदन, पार्वता ठाकरे, विलास राऊत, मुनीराज मौदेकर, अस्वलाच्या हल्ल्यात विदृप झालेल्या मिना राऊत, कुनाल राऊत उपस्थित होते.