एकाच परीवारातील ९ लोकांवर होणार कारवाई
डीसीपी च्या आदेशावर हिंगणा पोलिसांनी २० दिवसानंतर केला गुन्हा दाखल
नागपूर / अरुण कराळे:
नागपूर तालुक्यातील धामना (लिंगा) मध्ये एकाच परिवाराच्या ९ लोकांवर अॅट्रॉसिटी अॅक्ट चा गुन्हा दाखल झाल्याने परीसरात भयावह परीस्थिती निर्माण झाली आहे. पोलिस सुत्राच्या प्राप्त माहितीनुसार आरोपी विजय संभाजी तुरनकर (वय ५०) ,रवि संभाजी तुरनकर ,वैभव विजय तुरनकर,शोभा राजू तुरनकर ,नयन राजू तुरनकर,रानी राजू तुरनकर, बेबी खाडे ,प्रफुल खाड़े असे असुन फिर्यादी धामना येथील रहिवासी विनोद दाजीबा अंबादे आपल्या कुटुंबासमवेत तुरणकर परीवाराच्या शेजारी राहतात.
विनोदने आरोपीचा भाऊ देवेंद्र संभाजी तुरनकर वय ४२ च्या जवळून विनोद अंबादेनी अडीच वर्षापूर्वी घर विकत घेतले . तेव्हापासून अंबादे आपल्या पत्नी आणि मुलासोबत राहत आहे . अंबादेचा भाऊ देवेंद्र तुरणकर यांनी महार जातीच्या इसमाला घर का विकले म्हणून तुरनकर ने आपल्या भाऊशी वाद करणे सुरू केले.दोन्ही भावामध्ये घर विकण्यापूर्वी वाद झाला नव्हता.परंतु घर महाराला विकल्यामुळे तुरनकर परिवार खूप भडकले.
१ सप्टेंबर ला सकाळी ९ वाजता जवळपास तुरनकर परिवाराने अंबादे परिवारासोबत वाद केला . संपूर्ण कुटुंब येथेच थांबले नाही तर विनोद अंबादे यांच्या घरावर हल्ला करुन त्याच्यावर हल्ला केला.त्यात अंबादेच्या डोळ्यात व पत्नीच्या मानीला मार लागला.आणि महार लोकांना आम्ही येथे राहू देत नाही तुम्ही लवकर घर सोडा नाही तर जिवाने मारण्याची धमकी दिली.येथून घर रिकामे न केल्यास खैरलांची घडेल अशी धमकी तुरनकर परीवाराने दिल्याचे फिर्यादी विनोद अंबादे यांनी दिली.
अंबादे पति पत्नीने त्या दिवशी १०० नंबर वर फोन करून पोलिसांकडे तक्रार केली . हिंगणा पोलिस घटनास्थळी पोहचले व जखमींना पोलीस स्टेशनमध्ये घेवून आले.एन. सी . गुन्हा दाखल करून फिर्यादीला परत पाठविले .पोलिस तक्रारीत तुरनकर कुटूंबाविरोधात कोणतीही कारवाई न झाल्याने तुरनकर कुटुंबीयांनी विनोद अंबादेवर अधिक अत्याचार करण्यास सुरुवात केली.तुरणकर कुटुंबीयांनी जात निर्देशक शिवीगाळ करून दलित कुटुंबाला त्रास देतानाही तुरणकर कुटुंबीयांनी अनुसूचित जाती जमातीवर २० दिवस पर्यत कारवाई केली नाही.
या घटनेची सूचना १९ सप्टेंबर ला डीसीपी झोन १ च्या विवेक मासाळ यांना देण्यात आली. २० सप्टेंबर रोजी डीसीपी ने प्रकरणेला गंभीरतेने घेवून हिंगणाचे पोलीस निरिक्षक दिलीप साळुंके यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देवून डीसीपी मासाळ स्वतः एसीपी शिंदे व पीआई सह धामना स्थित पोहचले. या प्रकरणाची चौकशी केली व फिर्यादी विनोद अंबादे यांच्या तक्रारीवर डीसीपी विवेक मासाळ यांच्या आदेशावर हिंगणा पोलिसांनी आरोपी विजय संभाजी तुरनकर वय ५२,राजू संभाजी तुरनकर वय ५०,रवि संभाजी तुरनकर ,वैभव विजय तुरनकर,शोभा राजू तुरनकर ,नयन राजू तुरनकर, रानी राजू तुरनकर, बेबी खाडे बहन,प्रफुल खाड़े यांच्यावर १४३ , १४७ , १४९ , ३२३ , ५०४, ४२७ व ३ पोट कलम १ (आरएससीएल)व ३ , २ व्हीए अंतर्गत अॅट्रॉसिटी ऍक्टचा गुन्हा दाखल केला.आतापर्यंत पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले नाही.एसीपी शिंदे पुढील तपास करीत आहे .