Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट १२, २०१९

पुरोगामी शिक्षक संघटना करणार पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तुंचे वितरण


एका दिवसात जमा केली 1 लाखाची मदत
चंद्रपूर/प्रतिनिधी:
कोल्हापूर व आसपासच्या परिसरात अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीने चंद्रपूर जिल्ह्यातून मदत पाठवण्याचे ठरवले व तसे आवाहन शिक्षकांना केले, याला चांगला प्रतिसाद मिळाला व अवघ्या एका दिवसात 1 लाख रुपये मदत जमा झाली.

    सतत 6 दिवस हा परिसर पाण्याखाली होता, जगाशी संपर्क तुटला होता, जनजीवन विस्कळीत झाले आहे, त्यांचे जीवन पूर्वस्थितीत आणण्यासाठी सर्व स्तरातून मदत पाठवणे आवश्यक आहे. कोल्हापूर पुरोगामी शिक्षक परिवाराने पुरात अडकलेल्या लोकांना पोळी, भाजी, कपडे सतत 6 दिवस पुरवले. हळूहळू पूर ओसरत आहे मात्र पुरात सापडलेल्या लोकांनी आपले सर्वस्व गमावले आहे त्यांना नवीन जीवन सुरू करण्यासाठी आता तात्काळ मदतीची गरज आहे हे समजून पुरोगामी परिवाराने जीवनावश्यक वस्तूंची एक किट बनवून पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्त कुटुंबांना त्यांच्या घरी जावून वाटप करण्याचे ठरवले, एक "कुटुंब- एक किट" अशी ही संकल्पना आहे.

एका किट मध्ये किमान पुढील वस्तु असनार आहेत तांदूळ ५ किलो, तुरडाळ १ किलो, गव्हाचे पीठ ३ किलो, गोडेतेल १ किलो, तिखट पावकिलो, साखर १ किलो, चहापुड २०० ग्रॅम,  दंत मंजन १, खोबरेल तेल ५० मिली, साबन (प्लॅस्टिमध्ये पॅक करून) सदर वस्तू पिशवी किंवा बाॅक्स मध्ये घालून एक किट तयार करण्यात येईल. 

किट सोबत- खराब न झालेले चांगल्या स्थितीतील जुने कपडे संघटनेच्या वतीने पाठविले जाणार आहे. 600 रुपये प्रति किट याप्रमाणे एका दिवसात 167 किट देणगी रुपात जमा झाल्या. जमा किटस ची रक्कम व यादी 16 ऑगस्ट ला कोल्हापूर ला पाठवली जाणार आहे त्या रकमेतून किट तयार करून कोल्हापूर पुरोगामी परिवार गरजवंताना प्रत्यक्ष वाटप करणार आहे.

विद्यार्थीही पुरग्रस्तांसोबत
जिल्हा परिषद शाळा चीचगाव, तालुका ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी राखी विक्रीतून आलेली रक्कम पुरोगामी च्या पूरग्रस्त मदत निधीत एक किट जमा केली

     मदत संकलन उपक्रमासाठी विजय भोगेकर, हरीश ससनकर, रवी सोयाम, निखिल तांबोळी, अल्काताई ठाकरे, चंदाताई खांडरे, सुनीता इटनकर, शालिनी देशपांडे माधुरी निंबाळकर यांनी मदतीचे आवाहन केले तर
तालुका मदत निहाय संकलक करण्यात प्रतिभा उदापुरे, मनोज बेले, नरेश बोरीकर, संजय चिडे, वहिद शेख, सुनील जाधव, रणजित तेल्कापल्लीवार, सुधाकर कन्नके, जीवन भोयर, कैलास कोसरे ,नरेंद्र डेंगे,  निरंजन गजबे, रामेश्वर मेश्राम, गोविंदा गोहणे, गणपत विधाते, जगदीश ठाकरे, गंगाधर बोढे यांनी सहकार्य केले. 

जिल्हाभरातील शिक्षकांनी परिवार भरभरून मदत दिली. सर्वांचे संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.