शिवस्वराज्य यात्रेच्या औचित्याने जुन्नर येथे आयोजित सभेत बोलताना अजित पवार.
जुन्नर /आनंद कांबळे वार्ताहर
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आघाडी, मित्रपक्ष 175 जागा मिळविणार असा आत्मविश्वास व्यक्त करतानाच सत्ता, सत्तेतुन पैसा , पैशातून सत्ता असे राज्य सरकारचे नियोजन आहे.यांच्या काळात अदानी ,अंबानी यांच्यासारखे उद्योगपती अधिकच श्रीमंत झाले.गरीब गरीबच राहिले, राज्यातील पूरस्थिती दुर्लक्ष करून सत्ताधारी महाजनादेश प्रचार यात्रेत व्यस्त आहेत.पिकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाही ,यासाठी सत्ताधारी शिवसेना मोर्चे काढते यांच्यातच त्यांचा नाकर्तेपणा दिसून येतो अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या शिवनेरी ते रायगड शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ , प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील , अजित पवार ,विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, माजी आमदार पोपटराव गावडे,जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर , युवा नेते अतुल बेनके , राष्ट्रवादी प्रदेश युवा अध्यक्ष महेबूब शेख, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या फोजीया खान,विद्या चव्हाण,रुपाली चाकनकर आदीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थितीत यांच्या प्रमुख उपस्थितीत होते.
प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील यावेळी म्हणाले उद्याचा महाराष्ट घडविण्याची क्षमता दाखविणारी आमची शिवस्वराज्य यात्रा आहे.महाराष्ट्र राज्य कर्जबाजारी झाले आहे लोकांवर विविध कर लादले आहेत ,बेकारी वाढली आहे याला सत्ताधारी जबाबदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणात नेते बाहेर पडत परंतु यातून नवीन युवा नेत्तुत्वाला या माध्यमातून संधी मिळणार आहे.
मेगाभरती बेरोजगारांसाठी होती का काँग्रेस राष्ट्रवादी मधून पक्ष सोडणाऱ्यासाठी होती.मेगाभरतीत गुन्हेगारांचे उदात्तीकरण करण्यात आले. राज्य सरकार 50 हजार हेकटर जमीन ओलिता खाली आल्याचा दावा करते प्रत्यक्षात 1 हेक्टर जमीन देखील ओलिताखाली आलेली नाही. कर्जमाफीने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे,शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करता आले नाही अशी टीका धनंजय मुंडे यांनी यावेळी केली.
छगन भुजबळ यांनी ईव्हीएम मशीनच्या वापराबाबत काहीतरी गौडबंगाल असल्याचे सांगत मत पत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी केली. पिकविम्यात शेतकऱ्यांनाकाही मिळत नाही कंपन्यानंचा फायदा होतो अशी टीका केली.
खासदार अमोल कोल्हे म्हणाले, यात्रेच्या माध्यमातून नव्या स्वराज्याचा नवा लढा लढला जाणार आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा तळागावातील कार्यकर्ता जोपर्यंत भक्कम आहे,तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस अभेद्य राहणार आहे असे सांगताना ३७० कलम रद्द करण्यात सरकारचा हेतू कोसळलेली अर्थव्यवस्थेचे आलेले अपयश झाकण्यासाठीचा प्रयत्न नाही ना याचा विचार व्हावा अशी टीका कोल्हे यांनी केली.
फौजिया खान ,अतुल बेनके यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले . जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते .