मुख्यमंत्र्यांच्या गावात जाब विचारण्यासाठी आलो
- नाना पटोले
मूल :- राज्यातील फडणवीस सरकारने पाच वर्षात काय केले , याचा जाब विचारण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या गावात अालो अाहे , असे प्रतिपादन प्रदेश कांग्रेस कमेटीचे प्रचार समिती प्रमूख नाना पटोले यांनी केले . कांग्रेसच्या महा पर्दाफाश सभेच्या निमित्ताने ते मूल मध्ये बोलत होते .
राज्यातील भाजपाचे सरकार खोटारडे सरकार असून त्यांनी शेतकरी, युवक , गोरगरीब, छोटा व्यापारी यांची फसवणूक केली अाहे . शेतक-यांची साधी कर्जमाफी सुद्धा करता अाली नाही . २०१६ मध्ये दिलेले कर्जमाफीचे अाश्वासन हवेत विरल्याचे ते म्हणाले. एकीकडे राज्यात कोरडा अाणि अोल्या दुष्काळाचे संकट असताना मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस जनतेच्या पैशातून महा जनादेश यात्रा काढीत असल्याचा अारोप त्यांनी यावेळी केला . सत्ता जनतेसाठी असली पाहिजे , मात्र भाजपा सरकार येथिल व्यवस्थाच बदलविण्याचे धोरण अवलंबत अाहे. त्यामुळे यांचा पर्दाफाश करण्यासाठी कांग्रेसची महा पर्दाफाश सभा असल्याचे नाना पटोले म्हणाले . यावेळी त्यांनी मोदी सरकार , मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस , पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार , अदानी , अंबानी यांचा खरपूस समाचार घेतला .
महात्मा गांधींच्या पुतळ्याला मालार्पण करुन गुजरी चौकातील सभास्थळा पर्यंत रॅली काढण्यात अाली .
यावेळी बोलताना खा . बाळू धानोरकर म्हणाले , ३७० कलम रद्द केल्यामुळे देशात अशांतता पसरेल . मोदी सरकारने घेतलेला हा घातक निर्णय असल्याचे ते म्हणाले . संतोष रावत, नामदेव उसेंडी , प्रकाश मारकवार , देवराव भांडेकर , दिपक वाढई , विनोद अहिरकर यांची भाषणे झालीत .
मंचावर श्याम पांडे , संतोष रावत, नामदेव उसेंडी , प्रकाश मारकवार , देवराव भांडेकर , दिपक वाढई , विनोद अहिरकर , नंदू नागरकर , विनोद दत्तात्रय , अविनाश वारजुरकर ,चित्रा डांगे , दिनेश चोखारे , घनश्याम येनुरकर, राकेश रत्नावार, संजय मारकवार, विनोद कामडी , ललिता फुलझेले, वैशाली पुल्लावार , दशरथ वाकूडकर , रुपाली संतोषवार , मंगला अात्राम , कांग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते . सभेला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
वयोवृद्ध महिलेला मान देत नाना पटोले यांनी ताराबाई मोहुर्ले या वयोवृद्ध महिलेला मान देऊन अापल्या जवळ मंचावर बसविले.
यावेळी मुल येथिल सामाजिक कार्यकर्ता गौरव शामकुळे काँग्रेस पक्षात प्रवेश केला.