ब्रम्हपुरी पोलीसांचे धाडसत्र सुरु
ब्रम्हपुरी:
अवघ्या काही दिवसावर पोळा सण आल्याने संपुर्ण ब्रम्हपुरी तालुक्यात व शहरात मोठय़ा प्रमाणात अवैध दारू विक्री होत असल्याने ब्रम्हपुरी पोलीसांनी अवैध दारू विक्रेत्यांच्या विरोधात धाडसत्र सुरू करुन आठ लाखाच्या अवैध मुद्दे माल व वाहनासहत पाच आरोपींना अटक करण्यात आली.
दि. 24/08/2019 रोजी मुखबिर कडून खबर मिळाली की, वायगाव चोरटी मार्गाने एक सेंट्रो गाडी क्र. MH 31 AH 0913 मध्ये कन्हय्यासिंग भुराणी नावाचा इसम देशी दारू घेऊन जात आहे. त्यावरून सदर मार्गावर सापळा रचून खाजगी वाहनाने पाठलाग केला असता वायगाव चोरटी मार्गावर गाडी उभी करून चालक जंगलाचा फायदा घेऊन पळून गेला. सदर वाहनात खालीलप्रमाणे दारूचा साठा मिळून आला..
1) 16 पेट्या देशी दारूच्या प्रत्येकी 48 नग 180 ml नी भरलेल्या किंमत 1,53,600/- रु.
2) 4 पेट्या देशी दारूच्या प्रत्येकी 100 नग 90ml नी भरलेल्या किंमत 40,000/- रु.
3) एक जुनी वापरती सेन्ट्रो कार क्र.MH 31 AH 0913 किंमत 3,00,000/- रु.
असा एकूण 4,93,600/-रु. माल मिळून आला.
तर दुसर्या घटनेत आरोपी अतुल अरुण भानारकर रा. ब्रम्हपुरी यांच्या कडुन 90 नग देशी दारूच्या बाटल्या कीमंत 9000 व टीविएस कंपनीची आप्पाची गाडी MH 34 AN 1587 कीमत 50,000 असा एकुण 59,000 माला सहित आरोपी ला अटक करण्यात आली.
तर वैभव किसन प्रधान रा. फुलेनगर दोन मोटारसायकल सहित 1,43,000 जप्त करण्यात आले. व आरोपीस अटक करण्यात आली.
तर सुनिल दत्तुजी पिल्लारे रा. कुर्झा दुचाकी वाहनासहत हिरो स्पेल्डर गाडी सहीत एकुण 73,600 रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
तर सचिन पिल्लेवान रा. खेडमक्ता 8000 च्या मुद्दे मालासहित अवैध देशी दारू जप्त केली. असा एकुण चारचाकी वाहन व दुचाकी वाहने सहित अवैध दारू सहित ब्रम्हपुरी पोलीसांनी कार्रवाई केली आहे. सदर कार्यवाही ब्रम्हपुरी चे पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलिस निरीक्षक अख्तर सय्यद, NPC रॉय, PC संदेश देवगडे, अमोल गिरडकर, विजय मैंद, स्विकील उराडे, नीलेश राऊत यांनी सदर कार्यवाही केली. ब्रम्हपुरी पोलीसांचे धाडसत्र सुरु असल्याने अवैध दारू तस्करांचे धाबेदनानले असुन छुप्या मार्गाने अवैध दारू विक्रेत्यांने भाव वाढल्याने तळीरामांची गैरसोय होत आहे.