Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट १२, २०१९

परसोडीमध्ये भिंत कोसळल्यामुळे दुचाकीचा चेंदामेंदा

चांपा/प्रतिनिधी:

उमरेड तालुक्यात  सर्वाधिक जास्त पाऊस झाल्यामुळे गेल्या आठवड्याभरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे परसोडी येथील सुलोचना कळमकर वय ८०रा .नागपुर यांच्या दहा वर्षांपासून घर बंद असून  घरात  वापर होत नसल्यामुळे व संततधार पावसामुळे  जीर्ण झालेल्या घराची शुक्रवारी रात्री नऊ वाजता च्या सुमारास घराची  भिंत कोसळली .

यात शेजारी असलेले संभा वंजारी यांच्या घरा समोरील सुलोचना कळमकर यांच्या घराची भिंत कोसळल्यामुळे अंगणात असलेली दुचाकी क्रमांक एम .एच ४०.एम.८३९१चा   चेंदामेंदा झाला .संभा वंजारी यांच्या घरासमोर गावातील चिमुकले खेळत असल्यामुळे या दुर्घटनेत मोठी जीवितहानी टळली .व संभा वंजारी यांची दुचाकीचा चेंदामेंदा झाल्याने सुमारे ५६हजार रुपयांचे नुकसान झाल्याने  तत्काळ शासनाकडुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी यावेळी घर मालक व संभा वंजारी यांनी केली .



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.