Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑगस्ट ०४, २०१९

चंद्रपुर;अफवेमुळे लागली सरकारी यंत्रणा कामाला,रिकाम्या हाती परतले बचाव पथक


ललित लांजेवार/9175937925:
पुराच्या पाण्यात 3 महिला अडकल्या आहेत,सम्पूर्ण मंदिराची तीन मजली इमारत पाण्याखाली आहे,अशी बोम्ब गांवभर होते,जिकडे तिकडे पुराच्या पाण्यात 3 महिला अडकल्या असल्याची एकच चर्चा सुरु असते, अश्यातच संपूर्ण सरकारी यंत्रणा अग्निशमन विभाग,पोलिस,आपत्ती व्यवस्थापनाचा चमु अशे एकून 40-50 सरकारी कर्मचारी सायंकाळ पासून घटनास्थळी दाखल होतात. रात्री 11 वाजे पर्यंत शोध मोहिम हाती घेतात,बोटच्या माध्यमातून ही संपूर्ण शोध मोहिम राबविली जाते.मात्र ज्या ठिकाणी शोध घेतल्या जाते त्या ठिकाणी कोणीच नसते.व शोध पथक रिकाम्या हाताने परत येतात.अन नुसताच डोक्याला ताप होतो.

ही घटना आहे शनिवारी रात्रीची,सततच्या झालेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर येथील ईरई धरण शंभर टक्के पूर्ण भरला, अशातच  धरणाचे सातही दरवाजे उघड़ण्याची आवश्यकता निर्माण झाल्यामुळे या धरणाचे दरवाजे शनिवारी उघडण्यात आले.

या धरणाचे पाणी ईरई नदी मार्गे समोर जाते, तिथेच विठ्ठल मंदिरवार्ड परिसरातील वैभवलक्ष्मी मंदिर पाण्याखाली आले  त्या मंदिरात 2 ते 3 महिला अडकल्या आहेत .हे मंदिर तीन मजली असून त्यातील पहिला मजला पूर्ण पाण्याखाली आला, व त्यांना तेथून वाचवा असा संदेश सम्पूर्ण शहरभर 
वाऱ्याच्या वेगाने फिरु लागला. ही बाब माहित होताच शासकीय यंत्रणा कामाला लागली,मात्र संध्याकाळी 7 वाजे पासून रात्री 11.30 वाजता पर्यंत शोध मोहिम केल्या नंतर तेथे कोणीच दिसले नसल्याने बचाव यंत्रणा खाली हात परतले.


नक्की या पुरात किती महिला आहेत,हे कोणीही सांगू शकत नव्हते.मात्र या संपूर्ण प्रकारामुळे ही अफवा असल्याचे निदर्शनात आले.मात्र या अफवेमुळे संपूर्ण यंत्रणा किती जबाबदारीने काम करते याचे प्रात्यक्षिक शनिवारी या बघायला मिळाले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.