Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑगस्ट २३, २०१९

२ हजारांची लाच घेताना पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

चंद्रपुर/प्रतिनिधी:


रजा कालावधीतील पगार काढण्यासाठी २ हजारांची लाच घेताना पोंभुर्णा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी त्र्यंकेशवर कासरला हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले असून शिक्षण क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे.

 तक्रारदार हे चंद्रपूर येथील रहिवासी असून दोघेही पती - पत्नी शिक्षक आहेत. तक्रारदाराची पत्नी २०१८ - १९ या सत्रात पंचायत समिती पोंभुर्णा अंतर्गत ठाणेवासना येथील जिल्हा परिषद शाळेत सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत होती. जुलै २०१८ ते ऑक्टोबर २०१८ या कालावधीत आजारी तथा बालसंगोपन रजेवर असल्याने पत्नीचे मुख्याध्यापकामार्फत गटशिक्षणाधिकारी यांना रितसर अर्ज केला होता. तक्रारदाराच्या पत्नीचा जुलै २०१८ ते ऑक्टोबर २०१८ या कालावधीतील रजा कालावधीचे वेतन काढण्यासाठी पंचायत समितीचे गटशिक्षााधिकारी त्र्यंबकेश्वर कासरला यांना भेटले.

 माहे जुलै २०१८ ते ऑक्टोबर २०१८ या रजाकालावधीचे वेतन काढण्याकरीता ३ हजार रूपये लाचेची मागणी कासरला यांनी केली. याबाबत वर्धा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली.

वर्धा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक सुहास चौधरी यांनी गोपनियरित्या शहनिशा करून काल २२ ऑगस्ट रोजी सापळा रचला. कारवाईदरम्यान कासरला यांनी तडजोडीअंती २ हजारांची लाच स्वकारली. 

यावेळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. कासरला यांच्याविरूध्द रामनगर चंद्रपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर येथील निवासस्थानाची झडतीसुध्दा घेण्यात आली.सदर कारवाई पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक गजानन विखे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सुहास चौधरी , नापोकाॅ अतुल वैद्य, रोशन निंबोळकर, पोकाॅ सागर भोसले, प्रदिप कुचनकर, चालक निलेश महाजन यांनी केली आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.