Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑगस्ट ०७, २०१९

चंद्रपुर:इरई नदीत वाहून गेलेल्या युवकाचा तब्बल 24 तासांनी आढळला मृतदेह

चंद्रपूर पोलीस आपत्ती व्यवस्थापन पथकाला आले यश
ललित लांजेवार /चंद्रपूर

मंगळवारी ड्युटी वरून परत येत असताना पाण्याच्या प्रवाहात इरई नदीत कार सह एक युवक वाहून गेल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर पासून जवळच असलेल्या भटाळी-इरई नदीच्या पुलावर घडली होती. त्यांनतर शोध पथकाने घटनास्थळ गाठून शोधमोहीम राबविली होती.


 याच शोधमोहिमेला बुधवारी तब्बल 24 तासांनंतर शोध पथकाला यश आले.पुलापासून काही अंतरावर हि कार आढळून आली.या कार चे चारही दरवाजे काचेच्या खिडक्यासोबत बंद असल्याचे शोध पथकाला आढळून आले. व सूरज बिपटे याचा मृतदेह देखील त्याच गाडीत आढळून आला. तब्बल 24 तासाच्या अथक परिश्रमानंतर शोधपथकाला मृतदेह शोधण्यात यश आले.



मंगळवारी सुरज भटाळी येथील कोळसा खाणीतुन आपली ड्युटी आटोपून घराकडे येण्यासाठी निघाला होता.भटाळी गावाजवळील नदीवरील या पुलाची उंची अतिशय कमी आहे. मागील तीन दिवसांपासून ईरई धरणाचे सातही दरवाजे उघडले असल्याने पाण्याचा प्रवाह या पुलावरून सतत सुरू होता. अशातच या युवकने वाहत्या पाण्यातून कार टाकण्याचा प्रयत्न केला आणि तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला होता.


या घटनेची माहिती प्रशासनाला होताच शोधमोहीम पथकाने घटनास्थळ गाठून शोधमोहीम सुरु केली होती. तब्बल 24 तासाने कार मधून युवकाचे शव बाहेर काढले.ही शोधमोहीम यशस्वीरित्या राबविण्यास चंद्रपूर पोलीस आपत्ती व्यवस्थापन टीम चे कर्मचारी अशोक गरगेलवार, समीर चापले, दिलीप चव्हाण, उमेश बनकर , वामन नाक्षीने, गिरीश मरापे , मेकाशाम गायकवाड, मनदीप मत्ते , विक्की खांडेकर आदींनी परिश्रम घेतले.





SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.