चंद्रपूर/प्रतिनिधी:
राजुरा पोलिस ठाण्यातील पीएसआय विजय गोमलाडू आणि शिपाई सचिन भोयर यांनी तेलंगणा राज्यात मद्य प्राशन करून धुडगूस घातला होता. हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीरतेने घेत पोलीस विभागातून गोमलाडू यांची हकालपट्टी, तर भोयर यांना निलंबित करण्यात आले. पीएसआयला निलंबित करण्याची अश्या प्रकारे अजूनतरी वनांचे निलंबन केले गेले नसल्याची माहिती आहे.जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असल्याचे पोलिस वर्तुळात बोलले जात आहे.
६ दिवसाअगोदर पोलिस उपनिरीक्षक गोमलाडू, शिपाई सचिन भोयर हे तेलंगणा राज्यात गेले होते. त्यानंतर तेथे मद्य प्राशन केले. परतीच्या प्रवासादरम्यान दोन राज्याच्या सीमेवरील गोयगाव येथे ट्रकचालकांशी हुज्जत घातली. त्यानंतर ट्रकचालकांनी तेलंगणा पोलिसांकडे तक्रार केली. तेलंगणा पोलिसांनी घटनास्थळ गाठले तेव्हा यांचा धुडगूस सुरूच होता. तेथे उपस्थित नागरिकांनी या यासर्व प्रकाराचे मोबाईलवर चित्रीकरण केले. हे चित्रीकरण समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
पीएसआय गोमलाडू यांना वाचविण्यासाठी चंद्रपूरात सोशल मीडियावर एक संदेश फिरत होता,त्या संदेशात पीएसआय गोमलाडू यांची कोणतीही चूक नसल्याचे सांगण्यात येत होते,मात्र सच छूपता नही या म्हणीनुसार व्हिडिओ हा सर्व काही सांगून गेला,आणि हाच व्हिडिओ कारवाईसाठी पुरेसा ठरला. या व्हिडिओमध्ये सर्व संभाषण स्पष्ट ऐकू येत होते. त्यामुळे पाठराखण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील या कारवाईचा धसका बसला आहे.
या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी शिपाई सचिन भोयर यांना निलंबित केले. तर, पीएसआय गोमलाडू यांच्यावर निर्णय घेण्यासंदर्भात पोलिस महानिरीक्षकांकडे प्रस्ताव पाठविला. त्यानंतर पोलिस महानिरीक्षक मल्लिकार्जून प्रसाद यांनी गोमलाडू यांना सेवेतून बडतङ्र्क केले आहे. मद्यधुंद अवस्थेत पिस्तुल हवेत भिरकाविणे आणि परप्रांतात महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा मलिन करणे, हे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत.