पाणी व स्वछता विभागातील कंत्राटी कर्मचारी यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन
विविध मागण्यांसाठी 1 आगस्टपासून राज्यस्तरीय काम बंद आंदोलन
चंद्रपूर/प्रतिनिधी:
राज्य गटसंसाधन केंद्र पाणी व स्वच्छता विभाग कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने तुटपुंजे मानधन व इतर विविध मागण्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांना निवेदन दिले. तसेच विविध मागण्यांसाठी दिनांक 1 आगस्टपासून राज्य पातळीवर बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे.
गटसंसाधन केंद्र हे तालुका पातळीवर कार्यरत आहेत या कक्षातील कंत्राटी कर्मचारी हे पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजना गावपातळीवर राबविण्याचे काम करतात.
गटसंसाधन कक्षातील कंत्राटी कर्मचारी यांनी निवेदनात म्हटले आहे की 8 वर्षांपूर्वी च्या शासन निर्णया प्रमाणे 6000 हजार मानधन दिले जाते या तुटपुंज्या मानधनामुळे कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली असल्याने पाणी व स्वच्छता विभागात कार्यरतअसलेल्या गट संसाधन केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मानधनात वाढ करून देण्यात यावी अन्यथा दिनांक 1 आगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
शासनाने नवीन योजना मधील कंत्राटी कर्मचारी यांच्याप्रमाणेच मानधन द्यावे,आरोग्य विमा संरक्षण द्यावे ,58 वर्ष नौकरीची हमी द्यावी इत्यादी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
यावेळी चंद्रपूर जिल्हा पाणी व स्वछता कंत्राटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दादाजी बावणे,सचिव सुनील नुत्तलवार ,बीआरसी प्रतिनिधी सुवर्णा जोशी,प्रवीण निमकर,चेतन कलगट्टीवार, आर्शिया शेख,सुनील तामगाडगे, हर्षवर्धन गजभिये व सर्व तालुक्यातील बीआरसी उपस्थित होते.