ललित लांजेवार/नागपुर:
चंद्रपूरात धावत्या रेल्वे गाडीचे डबे मागे सुटल्याचा अजब प्रकार पुढे आला आहे.जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील माजरी येथील रेल्वे स्टेशनजवळ हा प्रकार घडला.मिळालेल्या माहितीनुसार संघमित्रा धावत्या एक्सप्रेसचे दोन डब्यामधील कपलिंग तुटल्यामुळे डबे मागे सुटले,या घटनेने एकच खडबड उडाली. ही घटना शुक्रवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास घडली.
ट्रेन क्रमांक 12296 या संघमित्रा एक्सप्रेसचे तीन डबे वगळता अन्य डबे गाडीपासून वेगळे झाले व गाडी सोडून पुढे निघून गेली, ही गाडी नागपूरवरून 6.15 वाजता बल्लारपूरकडे निघाली होती ,अशी माहिती आहे.
या घटनेनंतर परिसरात व रेल्वे विभागात चांगलाच गोंधळ उडाला,यानंतर बराच वेळ या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वेच्या या गलथानपणामुळे इतर रेल्वेगाड्यांना देखील याचा फटका बसलेला आहे.
या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी रेल्वेचा गलथानपणा पुन्हा एकदा समोर आलेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या संघमित्र एक्सप्रेसला एकूण बावीस डब्बे होते. यातील इंजन पकडून तीन डबे हे धावत्या रुळावरूनच पुढे निघून गेले,व इतर डबे रुळावरच अडकले.