चंद्रपूर/प्रतिनिधी:
दिनांक १६ जुलै, २०१९ रोजी श्री साईबाबा देवस्थान, हनुमान खिडकी रोड, भिवापूर वार्डात दरवर्षी प्रमाणे यावर्षी हि गुरुपौर्णिमा महोत्सव सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्वप्रथम सकाळी ७.३० वाजता महापौर सौ. अंजली घोटेकर यांचे शुभहस्ते भगवान श्री साईबाबा यांची आरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा आहे.
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती..
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य..
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक आहे. या जगात गुरुचा स्थान आहे सर्वश्री म्ह्णून सर्वांनी आपल्या गुरूंचा आदर केलाच पाहिजे. असे प्रतिपादन महापौर सौ. अंजली घोटेकर यांनी केले.
या नंतर श्री साई बाबा मंदिर परिसरात महापौर सौ. अंजली घोटेकर यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी महापौर म्हणाल्या कि सर्वानी कमीत कमी एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे. माणसांनी आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात जंगले तोडली आहे. या कारणामुळे आज संपूर्ण देशात प्रदूषणामुळे वातावरण बिघडलेला आहे. ज्यामुळे पाऊस येत नाही, तापमानात वाढ झाली आहे. तरी सर्वांनी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे. असे महापौर सौ. अंजली घोटेकर यांची या प्रसंगी म्हंटले.
या कार्यक्रमास श्री साईबाबा मंदिर चे पदाधिकारी, सदस्य व परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.