Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जुलै १२, २०१९

पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती नागपूर अंतर्गत मुरघास निर्मितीचे प्रात्यक्षिक संपन्न

नागपूर / अरुण कराळे :


विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प अंतर्गत पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती नागपूर मार्फत वैरण विकास कार्यक्रम सन २०१९- २०२० मध्ये बहुवार्षिक वैरणीचे ठोंबे  २ लक्ष २४ हजार यांचे पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत नुकतेच वाटप करण्यात आले.याच दरम्यान मदर डेअरीच्या संकलन केंद्रावर्ती  दूध टाकणाऱ्या पशुपालकांना विविध प्रकारच्या एकदल व द्विदल चाऱ्याचे पशूंआहारातील महत्त्व समजविण्यात आले. 



त्याच प्रमाणे हिरवा चारा उपलब्ध असताना मुरघास कसा तयार करावा याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले तीव्र उन्हाळ्यात हिरवी वैरणी उपलब्ध नसतांना मुरघास तयार करून ठेवलेले वैरण जनावरांना त्यांचे दूध उत्पादन व प्रकृती मान चांगले राहण्यास मदत होते याचे महत्त्व पटवून देण्यात आले तसेच कडबकुट्टी यंत्राचा वापर करून जनावरांना उपलब्ध वैरण कुटी करून दिल्यास चाऱ्याचा अपव्यय टाळता येतो व कामगारावर लागणार खर्च वाचतो.ही प्रात्यक्षिक मुख्यतः मदर डेअरी संकलीत केंद्र धामना, सातनवरी, पेठ पंचायत समिती नागपूर अंतर्गत घेण्यात आली. 
प्रात्यक्षिक मध्ये ९६ पशुपालकांनी सक्रीय सहभाग घेतला मुरघास निर्मितीचे तंत्र समजल्यावर चाराटंचाईच्या काळात पशुपोषणाचे प्रश्न मार्गी लागतील अशी आशा पशुपालकांनी केली.



 पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती नागपूरचे पशु आहारतज्ञ डॉ .किशोर भदाणे यांनी सर्व पशुपालकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले यावेळी पंचायत समिती नागपूरचे पशुधन विकास अधिकारी डॉ . प्रियवदा सिरास, डॉ .  शैलेश महाजन, डॉ . यु .के. गिरी ,डॉ . पवन भागवत, डॉ . दिलीप उघडे, डॉ . चंद्रकांत गडपाले परिचर दिनेश इंगळे, प्रकाश घागरे,राहुल रंधई उपस्थित होते.
पोल्ट्री आणि कँटल फिड उपलब्ध


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.