नागपूर/ललित लांजेवार:
संग्रहित छायाचित्र |
सुरतमधील तक्षशिला कॉम्प्लेक्समध्ये आग लागून १९ विद्यार्थी ठार झाल्याच्या घटनेने खडबडून जागे झालेल्या चंद्रपूर महानगरपालिकेने अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसलेल्या इमारतींची माहिती गोळा करत सर्वच कोचिंग क्लासेसला मागील महिन्यात नोटीस पाठवली होती.
अश्यातच चंद्रपूर शहर महानगरपालिकेने पुहा एकदा शहरातील काही कोचिंग क्लासेलला वारंवार नोटीस पाठवल्या मात्र अजूनही उपाय योजना न केलेल्या कोचिंग क्लासेसला ७ दिवसाची मुदत देण्यात आली आहे.
चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कोचींग क्लासेस, करीयर पॉईंटंस सेन्टर, स्टडीसर्कल, करीअर अकेडमी, ट्युशन क्लासेस व मुला-मुलींचे वसतीगृह यांचे संचालकांना महापालिकेने ७ दिवसाचा अल्टीमेटम पाठवला आहे.
विशेष म्हणजे चंद्रपूर शहरात १०० हून अधिक कोचिंग क्लासेस आहेत यातील ९० टक्के कोचिंग क्लासेस अवैधरीत्या सुरु आहेत,तसेच बहुतांश कोचिंग क्लासेसला शिक्षण अधिकाऱ्यांचे परवानगी पत्राच नाही,त्यामुळे शहरातील हे कोचिंग क्लासेस नेमके कोणच्या छत्रछायेत सुरु आहे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे चंद्रपूर शहरात १०० हून अधिक कोचिंग क्लासेस आहेत यातील ९० टक्के कोचिंग क्लासेस अवैधरीत्या सुरु आहेत,तसेच बहुतांश कोचिंग क्लासेसला शिक्षण अधिकाऱ्यांचे परवानगी पत्राच नाही,त्यामुळे शहरातील हे कोचिंग क्लासेस नेमके कोणच्या छत्रछायेत सुरु आहे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संस्थेच्या इमारतीमध्ये/जागेमध्ये अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परिक्षण करुन महाराष्ट्र आगप्रतिबंधक व जिवसंरक्षक अधिनियम - २००६ अन्वये उपाययोजना लवकरात लवकर करा ,आतापर्यंत अग्निशमन विभागाकडून ०३ वेळा सुचना देण्यात आलेल्या आहेत, मात्र या कोचिंग क्लासेसनी अद्यापपावेतो दखल घेण्यात आलेली नाही. ही अत्यंत गंभीर स्वरुपाची बाब आहे.तरी हे वृत्त वर्तमानपत्रात प्रकाशीत झाल्यापासुन ०७ (सात) दिवसाचे आत उपरोक्त अधिनियमानुसार आपल्या संस्थेच्या इमारतीमध्ये/जागेमध्ये आगप्रतिबंधक व जिवसरंक्षक उपाययोजना करुण या संदर्भातील त्वरीत अनुपालन अहवाल मनपा कार्यालयात सादर करावा, अन्यथा सबंधीत प्रकरणी उपरोक्त अधिनियमाच्या कलम ७ व ८ अन्वये विज पुरवठा व पाणी पुरवठा खंडीत करण्याची तसेच इमारत सिलबंद करण्याची कार्यवाही करण्यात येईल अशी ताकीद मनपा कडून देण्यात आली आहे.
मोठा गाजावाजा करीत खासगी क्लासेससाठी नियमावली करण्यात येणार असल्याचे जाहीर वक्तव्य केलेले शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना त्यासाठी अजूनही मुहूर्त सापडला नाही. राज्य शासनाने नियुक्त केलेल्या समितीने क्लासेससाठी आदर्श नियमावली सादर केली होती. त्यावर अद्याप काहीच निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे राज्यातील खासगी कोचिंग क्लासेसवर कोणतेही “कंट्रोल’ राहिले नाही.