(प्रशांत गेडाम/सिंदेवाही):
सिंदेवाही बसस्थानक तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.सिंदेवाही शहरातून गेलेल्या वर्दळीच्या महामार्गावर असल्यामूळे जिल्ह्याच्या नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि इतर ठिकाणी भरपूर प्रमाणात प्रवासी रोज बस्थानकावरून प्रवास करतात, सायंकाळी भरपूर जेष्ठ नागरिक बसतात.
तसेच इथे येणाऱ्या सर्व प्रवाश्याकरित पिण्याचे पाणी, शौचालय, कॅन्टीन, जनरल स्टोर, रसवंती, सुविधा उपलब्ध आहेत. शहराचे बाजूला लागून असलेले खेडे गावातील नागरिक स्वतःचे गाडीने सिंदेवाही पर्यंत आलेनंतर गाडी पार्किंग सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे गाडीचे चोरी प्रकार घडत असल्याचे बोलले जाते आहे. त्यामुळे पार्किंग सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे.
बस स्थानकामध्ये भरपूर मोकळी जागा आहे, त्या ठिकाणी पार्किंग सुविधा, प्रवाशांच्या सोयीसाठी सौंदर्यीकरणाच्या दृष्टीकोनातून छोटासा बगीचा सर्वांसाठी उपयोगी होईल अशी सुविधा करणे गरजेचे असल्याने बसस्थानकावर बगिचा व पार्किंग सुविधा निर्माण करण्याची मागणी नागरिक तसेच तालुक्यातील प्रवाशांचे व समस्त जनतेची आहे.