Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जून १२, २०१९

चांपा येथील पाणी समस्या लागली मार्गी

सरपंचाच्या पाठपुराव्यामुळे गावांमध्ये १०० 
केव्हीच्या ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण सोहळा संपन्न
उमरेड/प्रतिनिधी:
उमरेड तालुक्यातील गट ग्रामपंचायत चांपा अंतर्गत अनेक वर्षापासून चांपा गावांमध्ये भीषण पाणी टंचाईची समस्या जाणवत होती .ही समस्या विद्युत पुरवठा बरोबर उपलब्ध न झाल्याने उद्भवली .यामुळे त्रस्त ग्रामस्थांसह लोकनियुक्त सरपंच अतीश पवार यांनी शेवटी हताश होऊन उमरेडचे आमदार सुधीर पारवे यांच्याकड़े धाव घेतली .

आमदार सुधीर पारवे यांनी उमरेड व नागपुर येथील संबंधित वरिष्ठांशी संपर्क करून चांपा येथील वीजपुरवठ्याची समस्या मार्गी लावण्याची विनंती केली .लागलीच प्रकरणाचे गांभीर्य ओळखून महावितरणच्या अभियंत्यांनी संबंधिताना नवीन १००केव्हीच्या ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे आदेश दिले .परिणामी चांपा येथे नवीन १००केव्हीचे ट्रान्सफॉर्मरचे काम सुरू झाले व शनिवारी ता .८ रोजी सरपंच अतीश पवार यांच्या हस्ते लोकार्पण केले .

चांपा वासियांना पाणी पुरवठ्याकरीता चोविस तास १००केव्हीच्या उच्चदाबाचे वीज पुरवठा सुरू झाल्याने चांपा गावाची कायमची पाण्याची समस्या मार्गी लागली.चांपा येथे शासकीय सार्वजनिक विहिर असून त्यामध्ये मुबलक पाणीसाठा आहे .त्याचप्रमाणे गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची एकच टाकी असल्यामुळे गावांमधील तीन वार्ड मध्ये प्रत्येक दिवसाला एक वार्ड असा पाणी पुरवठा होतो .दर दहा मिनिटाला वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे दिवसांत एक पाणी टाकी भरत असल्यामुळे गावात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे . 

सरपंच अतीश पवार यांनी तातडीने १००केव्हीच्या उच्चदाबाच्या वीजपुरवठा गावांमध्ये सुरू करण्याकरिता महावितरण कंपनीला नवीन १००केव्हीच्या ट्रान्सफॉर्मरसाठी शासनास प्रस्ताव पाठविला व वेळोवेळी गावांमध्ये नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याकरीता पाठपुरावा केला असून गावांमध्ये कमी कालावधीत १००केव्हीचा ट्रांसफॉर्मर बसविण्याची मागणीला अखेर यश आले .

आमदार सुधीर पारवे , सरपंच अतीश पवार यांच्या प्रयत्नाने आज १००केव्हीच्या ट्रांसफॉर्मरचे लोकार्पण चांपा सार्वजनिक विहिर जवळ करण्यात आले .यावेळी गावांतील प्रतिष्ठित मंडळी उपस्थितीत सरपंच अतिश पवार यांच्या हस्ते १००केव्हीच्या ट्रांसफॉर्मरचे उदघाटन करून गावांमध्ये वीज पुरवठा सुरू करून गावामध्ये पाणी पुरवठा सुरू करण्यात आला .

लोकार्पण सोहळ्याला पंचायत राज चे अध्यक्ष व उमरेडचे आमदार सुधीर पारवे यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला , लोकार्पण सोहळ्यात पाचगाव येथील महावितरण अभियंता मोरेश्वर भानारकर , सरपंच अतीश पवार , उपसरपंच अर्चना सिरसाम ,लाईनमन डी .जी .पारवे .सहायक मुकेश बालपांडे , ग्रा सदस्य .मिराबाई मसराम , अस्मिता अरतपायरे , ग्रामसेवक सुनील तायवाडे , पाणी पुरवठा कर्मचारी प्रभाकर खाटिक ,राजू नेवारे , गावातील प्रतिष्ठित नागरीक माझी सरपंच सुरेश मसराम , झीत्रु तोडासे , रवी तोडासे , मारोती वरठी, दिगंबर घरत , वसंता कांबळे , पवन गुप्ता दिवाकर खाटिक चंदू कावळे , पराग मोहिते यांनी सरपंच अतीश पवार यांनी गावांतील पाण्याची समस्या मार्गी लावल्याने सर्व ग्रामस्थांनी सरपंच अतिश पवार यांचे आभार व्यक्त केले.

सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.