Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जून २४, २०१९

मांगली येथे वृध्दाची गळफास घेऊन आत्महत्या

चांपा/प्रतिनिधी:



उमरेड तालुक्यातील (मांगली) माजरी शिवारात अज्ञात कारणावरून गळफास घेऊन एका वृध्दाचा म्रुत्यु झाला .ही घटना ता शनिवारी . २२ रोजी उघडकीस आली .असून मृतक  अंकुश पुंडलिक कानफाडे वय ६५वर्ष रा .मांगली गावचा रहिवासी असून मृतक अंकुश कानफाडे हा मौजा रासा ता .चिमूर चंद्रपूर येथे आपल्या मुलीच्या भेटीला दि .२५ मे ला एकटाच गेला होता .

तेव्हापासून तो गावी परतला नाही त्यामुळे त्याचा मुलगा राकेश कानफोडे याने पोलिस स्टेशन उमरेड येथे जाऊन त्याचा वडील हरवल्याची तक्रार दिली .तेव्हापासून अंकुश पुंडलिक कानफाडे यांचा शोध घेत असताना शनिवारी दि २२जून रोजी सायंकाळी चार च्या सुमारास चांपा येथील आठवडी बाजारात अज्ञात म्रुत्युदेह असल्याचे चर्चेवरून समजले माजरी शिवारात वनविभागाच्या जंगलात एक म्रुत्युदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले .


या घटनेची माहिती मिळताच मांगली व चांपा येथील दोन्ही पोलिस पाटीलांनी  माजरी शिवारात वनविभागाच्या जंगलात पाहणी केली असता एका पळसाच्या झाडाखाली एका पुरुषांचे मृत्यूदेह कुजलेल्या अवस्थेत दिसले .मृतकच्या शर्टाच्या खिशात एक निवडणूक ओळखपत्र दिसले .त्यावरून म्रुत्यु देह हे अंकुश पुंडलिक कानफाडे वय ६५वर्ष रा मांगली येथील असल्याचे समजले अज्ञात कारणावरून पळसाचे झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे शोध घेत असताना निर्देशनात आले असल्याची मांगली येथील फिर्यादी पोलिस पाटील उमाकांत गोविंदराव मोटघरे यांनी पाचगाव पोलिस चौकीचे प्रभारीपोलिस उपनिरीक्षक प्रमोद राऊत यांना दिली .


माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक प्रमोद राऊत व सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक भोयर , मेजर संजय, पो .कॉ .गजानन कानडे यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व पोलिस पाटील यांच्या माहितीनुसार वृध्दाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निर्देशनात आले असून अज्ञात कारणांमुळे म्रुत्यु झाल्याची तक्रार पोलिस पाटील उमाकांत मोटघरे यांनी दिली .अज्ञात कारणांमुळे झाडाला गळफास लाऊन आत्महत्या केल्याचे निर्देशनात येताच  पाचगाव पोलिस चौकीत आकस्मिक म्रुत्युची नोंद करण्यात आली असून कुहीचे ठाणेदार पंजाबराव परघने यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक भोयर करीत आहेत .




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.