चंद्रपूर/प्रतिनिधी:
दारूंबदी असतानाही जिल्ह्यात दारूसह गांजा, अफू, ब्राऊन शुगर सारख्या अंमली पदार्थाची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असून, सोमवारी तेलंगणातून चंद्रपुरात होत.असलेली गांजा तस्करी रामनगर पोलिसांच्या
कारवाईने उजेडात आली. पोलिसांनी या कारवाईत ५९ किलो गांजा जप्त केला आहे. दोघांना गांजातस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. कोमल्लू शटराम गुंघलोत, बिळ्या कोट्ट्या बानोत दोघेही रा. श्रीनगर तेलंगना अशी अटकेतील गांजा तस्करांची नावे आहेत.
एका ऑटोतून गांजा नेत असल्याची गोपनीय माहिती रामनगर गुन्हेशोध पथकाला मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी चंद्रपूर-बल्लारपूर बायपास मार्गावरील डीआरसी हेल्थ क्लबजवळ सापळा रचला. संशयित ऑटो येताच पोलिसांनी ऑटो थांबवून ऑटोची झडती घेतली असता ऑटोमधून ५५ किलो गांजा पोलिसांना आढळून आला. तेलंगणा येथून हा गांजा आणल्याची माहिती आरोपींनी दिली आहे.ही कारवाई डीबी पथकाचे
साहाय्यक पोलीस निरीक्षक दरेकर, पोलीस उपनिरीक्षक मोरे यांच्या नेतृत्वात राकेश निमगडे, रुपेश पराते, नीलेश मुंडे, आनंद परचाके,गजानन डोईफोडे, मनोहर कामडी,सुरेश कसारे, सुरेश धडसे,दिनकर धोबे, प्रभूशंकर गावडे, ज्ञानेश्वर मडावी यांच्या पथकाने केली आहे. दारूबंदीनंतर जिल्ह्यात अंमली पदार्थाची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेष म्हणजे आंध्रप्रदेश राज्यातून रेल्वे आणि सस्ते मार्गाने ही गांजाची तस्करी होत असल्याचे पोलिसांच्या कारवाईत वेळोवेळी निष्पन्न झाले आहे.
सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड मिळेल |