मनपाला ३८ कोटींचा फायदा
नागपूर/प्रतिनिधी:
शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर आता जुने दिवे बदलून त्या ठिकाणी एलईडी दिवे लावले जात आहेत. यामुळे मनपाला कराव्या लागणाऱ्या वीजबिलाच्या खर्चात बचत झाली असून मनपाची वर्षाकाठी तब्बल ३८ कोटी रुपयांची बचत होत आहे. रात्री दहानंतर स्वयंचलित प्रणालीने एलईडी दिव्यांची तीव्रता कमी होत असल्याने दर महिन्याला २९ हजार युनिट विजेची बचत होत आहे.
महापालिका व नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएसएससीडीसीएल) संयुक्तपणे शहरातील जुने १ लाख ४३ हजार पथदिवे बदलविले आहे. त्या ठिकाणी नवे एलईडी पथदिवे लावले जात आहे. एलईडीच्या श्वेत प्रकाशाने संपूर्ण रस्ते उजळून निघत आहे. महापालिका व एनएसएससीडीसीएलने आतापर्यंत मुख्य रस्ते, अंतर्गत वस्त्यांतील रस्त्यांवर १ लाख १२ हजार एलईडी दिवे लावले. उर्वरित ३१ हजार एलईडी दिवे पुढील काही आठवड्यात लावण्यात येणार आहे. कधी काळी वर्षाला ५३ कोटींची वीज बिल भरणाऱ्या महापालिकेला आता केवळ १५ कोटी रुपयांपर्यंत वीज बिल भरावे लागत आहे. अर्थात वर्षाला .