Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जून ०४, २०१९

महावितरण़च्या पर्यावरणपुरक ‘गो-ग्रीन’ ला ग्राहकांची पसंती

जागतिक पर्यावरणदिन विशेष
नागपूर/प्रतीनिधी:
महावितरणने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत ग्राहकांना अनेक सुविधा व सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यानुसार लाखो ग्राहक बसल्या जागेवरून कधीही वीजदेयकाचा भरणा ऑनलाईन करीत आहेत. शिवाय पर्यावरणाचे संरक्षण करणे, प्रदुषण नियंत्रित करणे आणि वीज ग्राहकांचे पैसे वाचविणे या उद्देशाने महावितरणने सुरु केलेल्या पेपरलेस वीजबिल अर्थात गो-ग्रीन संकल्पनेला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून महावितरणच्या गो-ग्रीनच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, कागदी वीज बिलाची गरज नसणा-या नागपूर परिक्षेत्रातील अब्बल 9 हजार 264 ग्राहकांनी मासिक वीजबिलांसाठी कागदविरहीत गो-ग्रीन चा पर्याय स्विकारला आहे. या ग्राहकांना मासिक बिलात 10 रुपये सुट दिल्या जात आहे.

‘दिवस-रात्र असता जर ऑनलाईन तर मग बिल भरायला का लावता लाईन? या महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात लाखो ग्राहक संकेतस्थळ. मोबाईल अॅप, ऑनलाईन वॉलेट, पेमेंट प्लॅटफ़ॉर्म्स आदीचा वापर करून वीज देयकाचा भरणा ऑनलाईन करीत आहेत. वीजबिल ऑनलाइन बघण्यासाठी महावितरणने ग्राहकांना मोबाईल ॲप व www.mahadiscom.in या संकेतस्थळावर विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या सर्व सुविधा उपलब्ध असतानाही महावितरणतर्फे ग्राहकांना छापील बिलही उपलब्ध करून देण्यात येत आहेत. परंतु जे ग्राहक गो-ग्रीन सुविधेचा पर्याय निवडतात अशा ग्राहकांना छापीला ऐवजी ई-मेल व एसएमएस द्वारे वीजबिल उपलब्ध करून दिल्या जाते. अशा सर्व ग्राहकांना प्रति देयक दहा रुपये सवलत दिली जाते. गो-ग्रीन चा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी आपल्या वीज बिलावरील गो--ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरण मोबाईल ॲप द्वारे अथवा महावितरणच्या http://consumerinfor.mahadiscom.in/gogreen.php किंवा http:/wss.mahadiscom.in/wss येथे करावी असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. 

पर्यावरणप्रेमी ग्राहकांनी कागद वाचविण्यासाठी व कागदी वीज बिलाची गरज नसलेल्या वीज ग्राहकांनी गो ग्रीन हा पर्याय स्विकारीत ई-बिल चा वापर करणे म्हणजेच झाडांचे आणि पर्यायाने पर्यावरण संरक्षणास मदत करण्यासोबतच मासिक बिलात दहा रुपयांची बचतही आहे. नागपूर जिल्ह्यातील तब्बल 1897 ग्राहकांनी तर त्याखालोखाल अमरावती जिल्ह्यातील 1318 ग्राहकांनी गो-ग्रीनचा स्विकार करीत कागदी बिल नाकारले आहे, सोबतच बुलढाणा जिल्ह्यातील 1222, अकोला जिल्ह्यातील 1066, यवतमाळ जिल्ह्यातील 831, चंद्रपूर जिल्ह्यातील 735, वर्धा 565, गोंदीया 486, भंडारा 449, गडचिरोली 379 तर वाशिम जिल्ह्यातील 366 ग्राहकांनी गो-ग्रीनचा पर्याय स्विकारीत पर्यावरण संरक्षणासोबतच मासिक वीजबिलात दहा रुपयांच्या बचतीचा मार्ग अवलंबिला आहे. गो-ग्रीनचा पर्याय अधिकाधिक स्विकारून ग्राहकांनी पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

पर्यावरणपुरक गो-ग्रीनचा पर्याय स्विकारणा-या ग्राहकांचा तपशिल

परिमंडल जिल्हा गो-ग्रीन         ग्राहक

अकोला                                 1016

बुलढाणा                                1222

वाशिम                                   366

अमरावती                               1318

यवतमाळ                                831

चंद्रपूर                                     735

गडचिरोली                               379

गोंदीया                                    449

गोंदीया                                    486

नागपूर                                   1897

वर्धा                                        565

एकूण नागपूर परिक्षेत्र          9264

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.