उन्हाळयात रुग्णांच्या नातलगांची सोय, उपक्रमाचे सर्वत्र कौतूक
चंद्रपूर- पारा 47 अंशा पार गेला आहे. अश्यातच जिल्हासामान्य रुग्णालयात उपचारा करीता रुग्णांसोबत आलेल्या रुग्णांच्या नातलकांची मोठी गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेता रुग्णांच्या नातलकांच्या सोयी करीता यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किशोर जोरगेवार यांनी रुग्णालयात भव्य मंडप उभारला आहे. त्यामूळे उन्हाच्या तडाक्या पासून रुण्नांच्या नातलकांची काही प्रमाणात का होई ना सुटका झाली आहे.
चंद्रपूरातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील गैरसोयी नवीन नाही. मात्र याचा फटका आता रुग्णांसोबत आलेल्या त्यांच्या नातलगांना बसत आहे. रुग्णालयात रुग्णांच्या नातलगांसाठी सोयी सुविधा नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. दरम्याण चंद्रपूरातील सुर्याचा पारा चांगलाचा तापला आहे. या रखरखत्या उन्हात रुग्णांच्या नातेवाईंकांना जागा मिळेल तिथे आसरा घ्यावा लागत होता. ही परिस्थीती लक्षात येताच किशोर जोरगेवार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील डिलीवरी वार्डासमोरील मोकळया जागेत भव्य मंडप उभारला आहे. येथे या नातलगांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हेच्या तडाख्यातून सुटका करण्यासाठी रुग्णांच्या शेकडो नातलगांनी या मंडपात आसरा घेतला आहे. मंडपात खाली नातलगांना आराम करण्यासाठी ग्रीन मॅटीन टाकण्यात आली आहे. त्यामूळे जोरगेवारांनी उभारलेले हे मंडप रुग्णांच्या नातलगांसाठी वरदान ठरत आहे. जोरगेवारांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक केल्या जात असून त्यांच्या या उपक्रमामूळे व्हाईस ऑफ युथ पॉवर संघटणच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.