Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मे १६, २०१९

लग्नसमारंभास जाताना जवानाने बजावले कर्तव्य; वेळीच आगीवर नियंत्रण

दत्ताञय फडतरे /पुणे 

पुणे अग्निशमन दलाकडील देवदूत फायर याकडे कार्यरत असणाऱ्या एक जवान हर्षद येवले यांनी आज लग्नसमारंभास जाताना एका फ्लॅटमधे लागलेली आग विझवण्याचे कर्तव्य बजावले. जवान येवले हे रात्रपाळीस कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्रात कार्यरत आहेत.


आज सायंकाळी पाच वाजता जवान येवले हे उंड्री, रावत कॅपस्टोन बिल्डिंग येथे मावशीच्या घरी भावाला घेऊन लग्नाला जाण्याकरिता आले होते.  अचानक खाली तळमजल्यावर वर आठव्या मजल्यावर बंद फ्लॅटमधे आग लागल्याचे एका महिलेकडून समजताच वॉचमन व स्वत येवले यांनी फ्लॅटकडे धाव घेतली. फ्लॅट बंद होता परंतू चावी शेजारीच असल्याने त्यांनी फ्लॅट उघडून पाहताच लाकडी देवघर पेटले होते. वॉचमनच्या मदतीने उपलब्ध अग्निरोधक उपकरणाने हॉलमधे पेट घेतलेल्या लाकडी देवघर विझवले. फ्लॅटमधे मोठ्या प्रमाणात धुर झाल्याने सर्व दरवाजा खिडक्या उघडून धुर बाहेर जाऊन दिला. किचनमधे जात सिलेंडर ही तपासले.  

आग पुर्ण विझल्याची खात्री झाल्यानंतर जवान येवले यांनी तेथील रहिवाशी यांना पुढील सुचना दिल्या. जवान येवले वेळेवर पोहोचले नसते तर मोठा अनर्थ झाला असता म्हणत रहिवाशांनी त्यांच्या तत्परतेचे कौतुक केले. जवान येवले हे आपले कर्तव्य चोख बजावत पुढे मावसभावा सोबत लग्नसमारंभास रवाना झाले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.