Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मे १७, २०१९

मूलजवळ व-हाड्यांच्या खासगी वाहनाला अपघात

एक ठार, चौदा जखमी

मूल/ प्रतिनिधी- रमेश माहूरपवार

चंद्रपूर वरुन लग्न अाटोपून तळोधी बाळापूर येथे जाणा-या व-हाड्यांच्या खासगी वाहनाला गुरुवारच्या रात्रौ १० वा. दरम्यान मूल येथे अपघात झाला. यात फोटोग्राफरचा सहकारी घटनास्थळीच एक ठार झाला, तर चौदा व-हाडी गंभीर जखमी झाले . मृतकाचे नाव रोशन धर्माजी सावसाकडे , वय २६ , रा. अारमोरी असे अाहे . 

           तळोधी बाळापूर येथिल अशोक पोशट्टीवार यांच्या मुलाचा विवाह सोहळा १६ मे रोजी चंद्रपूर येथे  होता .  विवाह सोहळा , जेवण अाणि इतर लग्न विधी  अाटोपल्या नंतर स्वगावी परत निघाले . लग्न सोहळ्यासाठी व-हाड्यांच्या सेवेसाठी खासगी वाहन करण्यात अाले होते. काही व-हाडी एमएच ४० एन ४६७८ या टॅव्हल्स मध्ये बसले होते .  मूल  मार्गे जात असताना चालकाचे वाहनावरील संतुलन बिघडले. 

मूल येथिल महाराष्ट्र राइस मील च्या समोर असलेल्या एका वळणावरील  झाडाला जोरदार धडक दिली.  

         टॅव्हलस चालकाला वेगावर नियंत्रण घेता अाले नाही. त्यामुळे हा अपघात झाल्याचे एका व-हाड्याने सांगितले. अपघात एवढा गंभीर होत की वाहनाच्या समोरील भागाचा चुराडा झाला .  त्यात फोटोग्राफरचा सहकारी रोशन धर्माजी सावसाकडे ,  वय २६, रा. अारमोरी हा जागीच ठार झाला . गंभीर जखमींना मूल येथिल  उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात अाले .           तिरुपती गुरनुले , विजय लोहट , राजेश्वर नंदगुरवार, अमित पोशट्टिवार हे गंभीर असुन नवनाथ नन्नावरे ,प्रेमिला पडगिलवार , संतोष काशेटिवार ,नरेश बिल्लेवर, गिरिजा लोहट, कांताबाइ नन्नावरे, सुंदरा कामडे, पुश्पा भाडेकर अशी जखमीचे नाव  असुन प्राथमिक उपचार नंतर चंद्रपूरला हलवीण्यात अाले .

         दरम्यान, वाहनचालक  उमेश अात्राम हा सुद्धा जखमी असून त्याच्या विरुद्ध निष्काळजीपणाने वाहन चालविल्या प्रकरणी मोटार वाहन कायद्यान्वये मूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे . पुढील तपास पोलिस निरीक्षक कासार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक सोनेकर करीत अाहे .


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.